पुण्यासह कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - मंत्री चंद्रकांत पाटील

Feb 24, 2025 - 18:50
 0  114
पुण्यासह कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार - मंत्री चंद्रकांत पाटील

आय मिरर

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे वकील आहेत व मुख्यमंत्र्यांना खंडपीठाच्या मागणी संदर्भातला सर्व विषयाचा अभ्यास आहे. त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुण्यासह कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केले. 

कोथरूड वकील भाजप आघाडी व मंत्री चंद्रकांत पाटील वकील टीम आयोजित पुणे बार असोसिएशन निवडणूक 2025-26 मधील निवडून आलेल्या नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणीचा सत्कार समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते कर्वेनगर, पुणे येथे नुकताच पार पडला. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

या सोहळ्याला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष ॲड.डॉ.सुधाकर आव्हाड,मॅनेजिंग कौन्सिल शिक्षण प्रसारक मंडळ पुणे तथा महा सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ ॲड. सोहनलाल के.जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्विकृत नगरसेविका तथा प्रभारी कोथरूड वकील आघाडी भाजपा पुणे च्या ॲड. मीताली कुलदीप सावळेकर व कोथरूड वकील आघाडी भाजपा पुणे अध्यक्ष ॲड.जयदीप पटवर्धन यांनी या सोहळ्याचे आयोजन केलं होतं. 

पाटील म्हणाले की, पुणे न्यायालयातील विविध समस्या संदर्भात न्यायालयामध्येही प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन मी देत आहे. माहितीचा सरकार हे गतिमान सरकार आहे. पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे गेले अनेक वर्ष वकील संघटना प्रयत्न करीत आहेत. आता राज्याला उच्चशिक्षित वकील असा मुख्यमंत्री लाभलेला असल्याने आणि वकिलांचे प्रश्न त्यांना ज्ञात असल्याने लवकरच हा प्रश्न सुटेल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष एडवोकेट हेमंत झंजाड म्हणाले की,पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यंत आवश्यक आहे.यासाठी गेली 48 वर्ष पुणे शहर व जिल्ह्यातील असंख्य वकील पाठपुरावा करत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नांमध्ये स्वतः लक्ष घालून वकील संघटनेचा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

यावेळी ॲड.राजेंद्र दौंडकर,ॲड.पांडुरंग थोरवे,ॲड.अनिल नाईक,ॲड.प्रसाद कुलकर्णी,ॲड.तुकाराम कातुरे,ॲड.अर्चना कातुरे,ॲड.स्वाती काळभोर,ॲड.स्नेहल काळे,ॲड.आदित्य साखरे,ॲड.आशिष गवारे,ॲड.महेश काळभोर,ॲड.मिलिंद बाहुलीकर,ॲड.सुरेखा दाबी,ॲड.सोनम गवारे,ॲड.शरद तोडकरी, ॲड.अमितकुमार कोतमिरे यांसह विविध वकील बंधू भगिनी उपस्थित होते. 

दरम्यान ॲड.मोहना गद्रे यांची नोटरी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.सौ.मिताली कुलदीप सावळेकर यांनी केले. सूत्रसंचालन लक्षवेधी ॲड.अमितकुमार रमेश कोतमिरे यांनी केले.तर आभार ॲड.उमेश तारे यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow