एल.जी. बनसुडे विद्यालयात गजर हरिनामाचा

आय मिरर
पळसदेव येथील एल.जी बनसुडे विद्यालयाच्या प्रांगणात "विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हरे चिंता व्यथा क्षणार्धात" या उत्सवाच्या वातावरणात प्री प्रायमरी ते ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला.
या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी ,तुकाराम, नामदेव, मुक्ताई अशा विविध संतांच्या हुबेहूब भूमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. दिंडी सोहळ्यामध्ये वृक्षदिंडी ,पर्यावरण दिंडी,जलदिंडी, आरोग्य दिंडी,साक्षरता दिंडी या दिंडीच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृतीचे संदेश देण्यात आले.
ज्ञानोबा- तुकारामाचे अभंग व गजराने पळसदेव परिसरातील वातावरण दुमदुमून गेले होते. दिंडी सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे,कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, उपाध्यक्ष शितलकुमार शहा , सचिव नितीन बनसुडे,प्रिन्सिपल वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिंडी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्रवीण मदने, तेजस्वीनी तनपुरे,ज्योती मारकड तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामध्ये एकूण 750 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.संस्थेचे अध्यक्ष व पालक वर्गातून कौतुक करण्यात आले.
What's Your Reaction?






