महायुतीत दादांना किती जागा ? संभाव्य मतदारसंघाची यादी समोर

Mar 6, 2024 - 07:40
 0  965
महायुतीत दादांना किती जागा ? संभाव्य मतदारसंघाची यादी समोर

आय मिरर

लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाही अद्याप महायुतीत जागावाटप ठरलेलं नाही. तिन पक्ष एकत्र आल्याने अनेक जागांवरुन रस्सीखेच सुरू झाली आहे.

त्यामुळेच भाजपने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या नावांमध्ये महाराष्ट्रातील एकाही जागेचा समावेश नव्हता. अशात अजित पवार यांच्या संभाव्य मतदारसंघाची यादी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत एकूण 17 जागांची मागणी केली आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीत मागणी केलेल्या संभाव्य जागा

नाशिक

दिंडोरी

मुंबई उत्तर पूर्व

ईशान्य मुंबई

गोंदिया भंडारा

हिंगोली

धाराशिव

रायगड

बुलडाणा

माढा

सातारा

शिरूर

बारामती

परभणी

अहमदनगर

गडचिरोली

दरम्यान, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा सोडणार असल्याच्या चर्चा आहे. यामध्ये शिरूर, बारामती, रायगड, धाराशिव किंवा परभणी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow