बिग ब्रेकिंग | वाल्मीक कराड पुणे सीआयडी समोर शरण, वाल्मीक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू

Dec 31, 2024 - 14:22
 0  338
बिग ब्रेकिंग | वाल्मीक कराड पुणे सीआयडी समोर शरण, वाल्मीक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू

आय मिरर

बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार असलेला वाल्मीक कराड अखेर पुणे सीआयडी समोर शरण आला आहे. वाल्मिक कराडची सीआयडी कडून चौकशी सुरू असून तो आज मंगळवारी 31 डिसेंबर रोजी पुणे सीआयडी समोर शरण आला आहे.

वाल्मीक कराडच पुण्यात सीआयडी समोर आत्म समर्पण झालेल आहे.वाल्मीक कराड पवनचक्की खंडणी प्रकरणात मुख्य आरोपी आहे. सीआयडी कार्यालयात कराडची समोरासमोर चौकशी सुरू असून वाल्मीक कराड स्वतःच्या कारमधून सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला.एम एच 23 बीजी 2231 या कारमधून कराड सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाला.

9 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांचा क्रूरपणे खून करण्यात आला होता. तेव्हापासून या प्रकरणातील मुख्य आरोपींचा शोध सुरू होता. जवळपास 22 दिवस ओलांडून देखील आरोपी हाताला लागत नसल्याने समाज आक्रमक झाला होता. 28 डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीयांनी मिळून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी महामोर्चा देखील काढला होता आणि त्यानंतर आज अखेर वाल्मीक कराडने सीआयडी समोर आत्मसमर्पण केल आहे.

नाहीतर रस्त्यावर उतरू - मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा 

वाल्मीक कराडच्या अटकेनंतर आरोपींवर कठोर कारवाई करा नाहीतर रस्त्यावर उतरू असा इशारा म्हणून जरांगे पाटील यांनी दिला आहे. आता कोणत्या आरोपीला सोडू नका असं जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.सगळे आरोपी त्यांच्या मालकांसह आत जाणार आता कोणत्याच आरोपीला सोडू नका. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा समाजाचा विश्वासघात करू नये असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

हा खून साधा नाही यामुळे राज्य हळहळले आहे,यात कोणीही राजकारण करू नये, बीड जिल्ह्यात प्रचंड गुंडगिरी आहे सर्वसामान्यांना त्रास आहे.बीडमध्ये कोणतीच जात सुखी नाही. ही गुंडगिरी थांबणं गरजेचं आहे. त्यांनी जातिवाद पसरवला त्यातून गुंडगिरी निर्माण झाली असा आरोप ही जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडे यांवर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी जर दिलेला शब्द पाळला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर रस्त्यावर आलोच म्हणून समजा असा इशाराही जणांनी पाटलांनी दिला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow