70 हजार कोटींचा मीठू आता पोपट झाला ! मविआतील 'या' नेत्याची अजित दादांवर थेट टीका

Jan 3, 2024 - 20:43
 0  562
70 हजार कोटींचा मीठू आता पोपट झाला ! मविआतील 'या' नेत्याची अजित दादांवर थेट टीका

आय मिरर

७० हजार कोटींचा मलिदा खाणारे आज सत्ताधाऱ्यांच्या मांडीवर बसून पोपटासारखे बोलत असल्याची तिखट टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार व सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना केली.ते श्रीमंत देवाजी बाबू खोब्रागडे यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, ७० हजार कोटी खाल्ल्यानंतर बारामतीचा मीठू आता पोपट झाला आहे. खासदारांची स्थिती गुलामासारखी झाली आहे. ते काहीच बोलू शकत नाही. देवाजी बापू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजाभाऊ खोबरागडे यांच्या काळातही मतभेद होते. मतांतरे होती, पण विचार लोकशाहीचा होता. या सर्वांनी उपेक्षितांसाठी संघर्ष केला. पण आज मनुवादी विचारांचा देश उभा करण्याचे काम सुरू झाले आहे.

मी देव पाहिला नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात मला देव भेटला. मी त्यांच्या पुण्याईनेच इथपर्यंत पोहोचलो. तुम्ही पुन्हा चूक केली तर तुम्ही नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी मत द्या यासाठी हे बोलत नाही. तर संविधान व लोकशाही वाचवण्याची ही आपली सामूहिक जबाबदारी आहे यासाठी हे बोलत आहे, असे विजय वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow