मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जनतेने लाभ घ्यावा - रामहरी राऊत
आय मिरर
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यपद्धती लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आरोग्यवारी तथा आरोग्य संवाद यात्रेचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने इंदापूरात आयोजन करण्यात आले होते यावेळी राऊत बोलत होते.
राऊत म्हणाले की,मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाने रुग्णांच्या मदतीसाठी ३४० कोटींचे अर्थसहाय्य वितरीत करीत विक्रम रचला आहे.या कक्षात ना वशिला चालतो,ना ओळख लागते तर थेट मदत मिळत असल्याने गोरगरीब - गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा आशेचा किरण ठरला आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या ब्रॅण्ड ॲम्बेसडर पदी अवघ्या एक वर्षाच्या दुवा नावाच्या चिमुकलीची निवड करण्यात आली आहे.तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये रुग्णालय अंगीकृत ( empanel ) करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख पाहता दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या २ वर्षं २ महिन्यात एकूण ३४० कोटींपेक्षा जास्त रुपये अर्थसहाय्य वितरीत केले आहे.मु.वै.स.क. मंत्रालय, मुंबई कार्यालयामधून तब्बल २७४ कोटींपेक्षा अधिक तर मु.वै.स.क.,नागपूर कार्यालय मधून २७ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप करण्यात आले असून ४० हजार हुन अधिक गंभीर रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
यातून रुग्णांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा प्रत्यय आला असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मुंबईत मंत्रालयात जाण्याची देखील गरज नाही तर ऑनलाइन अर्जावर रुग्णांना मतद मिळते.रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी स्वतः थेट अर्ज करा आणि मदत मिळवा अशी ही सोपी पध्दत असून यासाठी 8650567567 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येतो आणि स्वतः अर्ज ही करु शकता.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली आहे.
What's Your Reaction?