जानकर पुन्हा सुळें विरोधात बारामती लोकसभा लढणार ? इंदापूरात कार्यकर्त्यांनी मंजूर केला ठराव
आय मिरर(देवा राखुंडे)
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर यांनी बारामती लोकसभेची निवडणूक लढवावी असा ठराव इंदापूर मध्ये सोमवारी दि.18 मार्च रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी सर्वानुमते मंजूर केला आहे.त्यामुळे महादेव जानकर आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंविरोधात दंड थोपाटणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
रासपचे पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोफणे,पुणे जिल्हा नियोजन उपसमितीचे सदस्य तानाजी शिंगाडे,बारामती लोकसभा प्रभारी रंजीत सूळ, बारामती विभागाचे अध्यक्ष संदीप चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी 18 मार्च रोजी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या पोलिंग बूथ प्रमुखांची बैठक शहरातील एका खागजी हाॅटेलात पार पडली यात हा ठराव करण्यात आल्याचं किरण गोफणे यांनी सांगितले.
गोफणे म्हणाले की, जानकर यांना 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून कमी कालावधीमध्ये चार लाख 52 हजार मतदान मिळाले होते.त्यावेळेस अचानक उमेदवारी जाहीर झाल्यामुळे थोडक्या मतांनी पराभव झाला होता परंतु गेल्या काही वर्षापासून महादेव जानकर यांचा बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येक गावांमध्ये चांगल्या पद्धतीने संपर्क असून इंदापूर तालुक्यातील व बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध पक्षांचे नेते सर्वसामान्य जनतेची जानकर यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदार संघातून लढवावी अशी मागणी आहे. त्यानुसार सर्वानुमते महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढावी असा असा ठराव संमत करण्यात आला.
यावेळी तालुकाध्यक्ष तानाजी मारकड, कार्याध्यक्ष नवनाथ कोळेकर, उपाध्यक्ष लक्ष्मण तरंगे, बारामती लोकसभा उपाध्यक्ष सोमनाथ पांडुरंग,इंदापूर विधानसभा अध्यक्ष बजरंग वाघमोडे, महिलाआघाडी तालुकाध्यक्षा कांचन धायगुडे,बारामती प्रभारी दिलीप धायगुडे, गणेश हेगडकर, तात्याराम मारकड,अविनाश मोहिते, सचिन शहा,आप्पा माने, सचिन सुळ,सचिन गोपने, नितीन शिंगाडे, नवनाथ कुलाल, शहाजी बाळे,दयानंद हेगडकर आदींसह पोलिंग बूथ प्रमुख उपस्थित होते.
बारामती तर माझा आत्मा…
दरम्यान जानकर यांनी जुलै 2023 मध्ये बारामतीतून पुन्हा लढण्याची इच्छा व्यक्त करीत बारामती तर माझा आत्मा आहे. एक दिवस मी पंतप्रधान होऊन पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहे आणि तेही माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या जोरावर. मी कोणाचीही मदत घेऊन येणार नाही. आमची आघाडी कुणाबरोबही होऊ शकते, मात्र माझी अंतिम इच्छा ही बारामतीतून लढण्याची आहे.असं म्हटलं होतं त्यामुळे जानकर आता बारामतीतून शड्डू ठोकणार का याकडे ही सर्वांची नजर लागली आहे.
बारामती लोकसभेत सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम…
महादेव जानकर यांनी 2014 मध्ये प्रथमचं बारामती लोकसभेची निवडणूक लढविली होती. यावेळी बहुतांश मतदारांना महादेव जानकर यांचा चेहरा ही माहिती नव्हता. तरी देखील अल्पावधीत जानकर यांनी पवारांच्या बालेकिल्ला लढवून मतदार संघातून सुप्रिया सुळेंविरोधात तब्बल 457843 इतकी मते घेतली होती.जानकर यांच्या नावावर हा विक्रम कायम आहे.पवारांच्या बालेकिल्ल्यात सुळे केवळ 69719 मतांनी विजयी झाल्या होत्या.
2014 चा मतदारसंघनिहाय निकाल
इंदापूर तालुका मतदान
सुप्रिया सुळे – 87150
महादेव जानकर – 65492
(सुप्रिया सुळेंना 21658 ची आघाडी)
बारामती तालुका मतदान
खासदार सुप्रिया सुळे – 142628
महादेव जानकर – 52085
(सुप्रिया सुळे यांना 90543 मतांची आघाडी)
भोर तालुका मतदान
खासदार सुप्रिया सुळे – 90915
महादेव जानकर – 74030
(सुप्रिया सुळे यांना 16885 मतांची आघाडी)
दौंड तालुका मतदान
खासदार सुप्रिया सुळे – 57289
महादेव जानकर – 82837
(महादेव जानकरांना 25528 मतांची आघाडी)
पुरंदर तालुका मतदान
खासदार सुप्रिया सुळे – 72431
महादेव जानकर – 78667
(महादेव जानकरांना 6065 मतांची आघाडी)
खडकवासला तालुका मतदान
खासदार सुप्रिया सुळे – 70602
महादेव जानकर – 98729
(महादेव जानकरांना 28127 मतांची आघाडी)
अंतिम निकाल
खासदार सुप्रिया सुळे : 521562 मतं, 69719 मतांनी विजयी
महादेव जानकर (रासप) 457843 मतं
सुरेश खोपडे (आप) 26396 मतं
What's Your Reaction?