महाराष्ट्र केसरीत आधी पाठ ? नंतर लाथ आणि मग पोलिसांचा प्रसाद...
आय मिरर
अहिल्यानगर पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट लागल्याचं दिसून आलं. पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत झालेल्या नांदेडच्या शिवराज राक्षेने पंचाना लाथ मारली आणि स्पर्धेच्या ठिकाणी एकच गोंधळ झाला. पंचांचा निर्णय मान्य न झाल्याने शिवराज राक्षेने हे कृत्य केलं.
यावेळी दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापटही झाल्याचं दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. नंतर हे दोन्ही मल्ल व्यासपीठावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले.
महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. मात्र, “माझी पाठ टेकली नव्हती,” असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत.
हुज्जत घालणं भोवलं… शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड निलंबित
स्पर्धेत पंचांला लाथ मारणं आणि त्यांच्याशी हुज्जत घालणं शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडला चांगलंच भोवलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या दोघांवर कठोर कारवाई केली आहे. कुस्तीगीर परिषदेने या दोघांनाही तीन वर्षासाठी निलंबित केलं आहे. परिषदेचा हा निर्णय दोन्ही पैलवानांसाठी अत्यंत मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य सामन्यावेळी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली होती. त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. धक्काबुक्कीही सुरू झाली. तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना सुरू झाला. यावेळी हाफ टाइममध्ये महेंद्रने पंचाशी वाद घालयाला सुरुवात केली. त्याने पंचाला शिवागीळ केली आणि हुज्जत घालत थेट मैदानच सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. मात्र, या दोन्ही पैलवानांच्या गैरवर्तनाची दखल घेऊन त्यांना तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
What's Your Reaction?