किमान पाण्याची तरी आठवण ठेवा ! 2024 पुन्हा ती चूक नको - आ.दत्तात्रय भरणे

Feb 2, 2024 - 08:30
Feb 2, 2024 - 08:32
 0  956
किमान पाण्याची तरी आठवण ठेवा ! 2024 पुन्हा ती चूक नको - आ.दत्तात्रय भरणे

आय मिरर(देवा राखुंडे)

लोणी देवकरचा २०१२ चा काळ आठवला तर त्यावेळी लोणी देवकर ला सहा महिणे पाण्याचा टँकर लागत होता. महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता हे आजही आठवते. 2012 ला जेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झालो तेव्हा लोणी देवकरला पाण्याची योजना मी केली म्हणून गांव आज पाणी पितयं. किमाण पाण्याची तरी आठवण ठेवा म्हणत लोणी देवकर साठी आजपर्यंत कोट्यावधींचा निधी देऊनही अपेक्षित मतदान मिळाले नसल्याची खंत बोलून दाखवत 2024 च्या निवडणुकीत ही चूक करू नका असे आवाहन इंदापूरचे आमदार माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लोणी देवकरकारांना केलं आहे.

गुरुवारी दि.०१ फेब्रुवारी रोजी इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर मध्ये 22 कोटी 67 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले यावेळी आयोजित जाहीर सभेत आमदार भरणे बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, कार्याध्यक्ष अतुल झगडे, सचिन सपकळ, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,बाळासाहेब काळे,दिपक जाधव, शुभम निंबाळकर, संदेश देवकर,मेघराज कुचेकर-पाटील,संग्राम देशमुख, सचिन खामगळ व इतर अनेक मान्यवरांच्या व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

भरणे म्हणाले की,लोणी देवकराला आजपर्यंत मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यापासून कोट्यावधींचा निधी दिला.गंगावळण एवढीच कामे लोणी देवकर ला मी यापूर्वी केली. त्यावेळी काही लोकांनी तुमचा गैरसमज केला त्यामुळे मला लोणी देवकर करांनी कमी मतदान केले याची खंत ही भरणे यांनी बोलून दाखवली.

विरोधकांनी लोणी देवकर मध्ये जातीवादाचे विष पेरले आणि काही जण त्याला फसले. मात्र कामाची माणसे ओळखता आली पाहिजेत. निवेदन देऊन फोटो काढून कामे होत नसतात.२०२४ ला जर मी काम केले नसेल तर लोक मतारुपी बघून घेतील ना ? मग पुढे पुढे का करता म्हणतं त्यांनी विरोधकांवरती निशाना साधला. एखादा रस्ता खराब असेल तर त्याची दुरुस्ती केली जाईल पण खराब बाब दाखवण्यापेक्षा चांगले केलेले काप पण जनेतेने पाहिले पाहिजे. जातीवादाचे विष पेरणा-या मासणांपासून सावध रहा असे आवाहन भरणे यांनी केले.

२०१२ पूर्वी विरोधकांनी लोणी देवकर मधील विकास कामे का केली नाहीत.आज जी कामे मी करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी खूप कष्ट करावी लागतात.खुप झिजावे लागते तेव्हा कामे होतात.पूर्वी भावडी, बळपुडी,न्हावी, वरकुटे बु. पळसदेव भागात रस्त्यांची अवस्था काय होती.मला एकच विनंती करायची आहे. लोणी करांनी सर्व जुणे नवे वाद मिटवा.माझ्यासाठी सर्व सारखे आणि गावाचा विकास महत्वाचा आहे. २०२४ ला आपल्याला विरोधकांच्या पोळ्या भाजून द्यायच्या नाहीत.

उजनीचं पाणी खाली चालले आहे. या भागात बुडीत बंदारे निर्माण करावे लागतील.त्यासाठी यापूर्वीच लक्ष घातले आहे.२२ गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ५ टीएमसी ची योजना केली होती मात्र काही लोकांना फक्त राजकारण करायचे आहे.त्यांनी सोलापूरकरांची माथी भडकवली आणि ती योजना हाणून पाडली पण परमेश्वर त्याची शिक्षा त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. 

इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या विविध विकास कामांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी पुढील आठवड्यात उपलब्ध होत आहे.यापूर्वी तालुक्यात कधीही स्वतंत्र मुस्लिम समाजासाठी निधी आला नव्हता. गंगावळण सारख्या गावात पर्यटन साठी कोट्यावधी रुपये निधी मंजूर केला. पूर्वी त्या गावची परिस्थिती काय होती याचाही जनतेने विचार करावा.

पूनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या मदतीने तालुक्यात विविध ठिकाणच्या पुलासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आनला आहे. पुणे जिल्हाधिकारी यांची दोन दिवसात बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंदापूर मधील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी आणि चाँद शाहवली बाबांच्या दर्गाह च्या कामाकरीता मंजूर आरखड्यापैकी २४ कोटी रुपयाला प्रशासकीय मंजूर दिली आहे.पुढील आठवड्यात याची निविदा काढली जाईल.

खराब रस्त्याची मी स्वत: चौकशी लावण्याची मागणी करणार आहे. जो रस्ता खराब झाला आहे तो दुरुस्त केला जाईल.यासोबतचं लोणी देवकर मध्ये महिला अस्मिता भवन निर्मितीसाठी १५ लाख निधीची घोषणा भरणे यांनी केली. येणा-या दहा दिवसात लोणी देवकरला ओपन जीम बसवली जाईल.लोणी देवकर मधील जिल्हा परिषद शाळेचा इमारतीचा प्रश्न मार्गी लावला जाईल.लवकरचं लोणी देवकर परिसरातील कोकण रस्त्याची अडचण सोडवली जाईल.यासह इतर अडचणी टप्प्याटप्प्याने आपण सोडवणार असल्याचे भरली यांनी आश्वासित केले.

जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की,लोणीवदेवकरकरांनी आजपर्यंत पाहुण्याला खूप जपले. गेले कित्येक वर्ष या भागाने आम्हाला मतदान दिले नाही, सहकार्य केले नाही.मात्र ज्या पाहुण्याला जपले त्या पाहुण्याने तुम्हाला काय दिले ? गेल्या वीस वर्षात तुम्हाला काय मिळाले ? असा प्रश्न आमच्यासारख्याला पडतो.ज्यांनी 20 वर्षात विकास केला नाही त्यांचा निषेध नोंदवण्यापेक्षा खरा तर लोणी देवकरकरांचा निषेध नोंदवला पाहिजे कारण नात्याच्या पलीकडे त्यांना काही कळालेच नाही. या देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आहे.तेच या देशाचे उत्तम नेतृत्व करू शकतात आणि त्यांच्या नेतृत्वाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आज जी विकासाची गंगा आपण पाहत आहोत ते विकासाची गंगा इंदापूर तालुक्यात फक्त अजित पवार सरकारमध्ये आहेत म्हणून येत आहे.ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.आगामी काळात लोकसभेच्या निवडणुका लागतील कोणी भावनिक आव्हान करील मात्र त्या आव्हानाला बळी पडू नका.अजित पवार जो पक्षाचा उमेदवार देतील त्याच उमेदवाराला आपल्याला लोकसभेला मतदान करून मोदींचे हात बळकट करायचे आहेत असे आवाहन गारटकर यांनी केले.

दरम्यान लोणी देवकर मधील भाजपमध्ये कार्यरत असणाऱ्या शरद देवकर यांचा त्यांच्या काही सहकाऱ्यांनी आमदार भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आमदार भरणे यांना साथ देण्याचे घोषणा केली. यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,प्रशांत गलांडे-पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. शरद देवकर,अँड. अवधुत डोंगरे यांनी लोणी देवकर करांच्या वतीने आमदार भरणे यांपुढे गावातील काही समस्या मांडत त्या सोडवण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निलेश धापटे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow