वीर धरण ७० टक्के भरले ! नीरा खोऱ्यात संततधार पाऊस
आय मिरर
वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या संततदार पावसामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.वीर धरणात आज बुधवारी सकाळी 70 टक्के पाणीसाठा झाला आहे.
वीर धरणाची 9 पूर्णांक 815 टीएमसी क्षमता असून 6 पूर्णांक 621 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय.म्हणजेच वीर धरणात 71 टक्के पाणीसाठा झाला आहे.
भोर आणि राजगड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निरा नदी प्रणाली मध्ये असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.नीरा नदी प्रणाली मध्ये असलेल्या भाटघर, गुंजवणी आणि निरादेवघर या धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
आज बुधवारी सकाळी पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार भाटघर धरणात ७१ टक्के म्हणजे १४ टीएमसी पाणी साठा झाला असून नीरा देवघर धरण 53 टक्के भरले असून या धरणात ६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.गुंजवणी धरण ६५ टक्के भरले असून या धरणामध्ये आता अडीच टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे तर या चारही धरणात मिळून २५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
तर वीर धरणाच्या उजव्या कालव्यातून १२०० क्यूसेक तर डाव्या कालव्यातून ७०० क्यूसेक वेगाने पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत आहे. या चारही धरणांच्या पाण्यासाठ्यावर पुणे जिल्ह्यातील पुरंदर,बारामती इंदापूर या तालुक्यातील तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे. धरणामध्ये पाणी आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
What's Your Reaction?