"चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष" पुणे सोलापूर महामार्गावर पळसदेव गावी झळकले फ्लेक्स ! नेतेमंडळी ही आल्या पावली परतली

Sep 15, 2023 - 11:31
 0  2554
"चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष" पुणे सोलापूर महामार्गावर पळसदेव गावी झळकले फ्लेक्स ! नेतेमंडळी ही आल्या पावली परतली

आय मिरर

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापल्याचं पहायला मिळतेय. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावामध्ये सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.अशा आशयाचे बॅनर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पळसदेव गावच्या कमानीजवळ लावण्यात आलेले आहेत.जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना आम्ही गावात प्रवेश देणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे. चुलीत गेले नेते आणि चुलित गेले पक्ष आता फक्त मराठा आरक्षण लक्ष अशा पद्धतीचा मजकूर या बॅनर वरती लिहित सकल मराठा समाज बांधवांनी राजकिय नेते मंडळी आणि बाबत असणारा संताप व्यक्त केला आहे.

मराठा समाज बांधवांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे त्यांना कुणबी असल्याचा दाखला देण्यात यावा या मागणीला घेऊन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांनी तब्बल 17 दिवस आमरण उपोषण केलं. अखेर सरकार नमले आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत जरांगे पाटील यांना आपलं आमरण उपोषण सोडण्यास विनंती केली. यावर सरकारला काही दिवसांची मुदत देत जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडले आहे.मात्र साखळी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. या घडामोडीनंतर देखील राज्यात विविध ठिकाणी मराठा समाज बांधव आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक असून आता थेट जोपर्यंत मराठा आरक्षण देत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय पुढार्‍यांना गावात प्रवेश बंदी असा निर्णयचं सकल मराठा समाज बांधवांनी केल्यांचं पहायला मिळतयं.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील पळसदेव ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक 14 सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेत तशा आशियाचे बॅनर त्या ठिकाणी लावले.पळसदेव कामानी जवळ समाज एकवटला होता याच दरम्यान पळसदेव गावातील दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने हे पळसदेव मध्ये दाखल झाले त्यांनी तरुणांना मला कार्यक्रम स्थळी जाऊ द्या अशी विनंती केली मात्र सकल मराठा समाज बांधवांनी प्रवीण माने यांना विरोध दर्शवला.यानंतर आल्या पावली प्रवीण माने यांना माघारी परतावं लागलं.त्यांनी फोनवरूनच दहीहंडी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या तर या सोहळ्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे देखील उपस्थित राहणार होते. मात्र गावाने घेतलेला निर्णय घेतल्याचे समजताचं आमदार भरणे यांनी देखील दहीहंडी सोहळ्याला फोनवरून शुभेच्छा देणे पसंत केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow