त्या सत्तर प्रवाशांच्या आयुष्याची स्टेअरींग लांडे यांच्या हातात होती,प्रसंग बाका होता पण एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवले अन्

Nov 22, 2023 - 08:22
Nov 22, 2023 - 08:24
 0  486
त्या सत्तर प्रवाशांच्या आयुष्याची स्टेअरींग लांडे यांच्या हातात होती,प्रसंग बाका होता पण एसटी चालकाने प्रसंगावधान दाखवले अन्

आय मिरर

आंबेगाव तालुक्यातील मंचर एसटी आगाराची मंचर-पिंपळगाव मार्गे पारगाव कारखाना एसटी गाडीचा हवेचा पाईप फुटल्याने अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे प्रवासी नागरिकांची एकच धांदल उडाली होती.

मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे चालकाने गीअर कंट्रोल करीत गाडीवर नियंत्रण मिळवले. यामुळे एसटी बसमध्ये असणार्‍या जवळपास 70 प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना कळकाई- बेलसरवाडी येथे सोमवार, दि.20 रोजी 3.30 वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, की मंचर एसटी आगाराची एसटी बस मंचर बसस्थानकातून पिंपळगावमार्गे पारगाव कारखाना बस ही प्रवाशांना घेऊन निघाली होती. संतोष नारायण लांडे चालक आणि वाहक चंद्रकांत चपटे हे प्रवाशांना घेऊन निघाले होते. यात जवळपास 78 प्रवासी होते. पिंपळगावच्या आसपास एसटी गाडीतून 8 प्रवासी खाली उतरले. गाडीला ब्रेक थोडा कमी होता. त्यामुळे गाडीचा स्पीड कमी होता. मात्र, एसटीत प्रवासी अधिक असल्याने गाडी कमी वेगाने चालली होती.

एसटी गाडी चालवत असताना एसटी गाडीचा हवेचा पाईप तुटला आणि त्यातच ब्रेक फेल झाला. गाडीची हवा गेल्यानंतर गाडी गीअरवर कंट्रोल करून कशीबशी चालकाने स्लो केली. मात्र, प्रवाशांना याबाबत माहिती मिळताच प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. ब्रेक फेल झाल्याने ड्रायव्हरने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यामुळे 70 प्रवाशांचे प्राण वाचले. चालकाच्या या कामगिरीने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow