जरांगे पाटलांच्या लढ्याला यश ! इंदापूरच्या कांदलगांव, बावड्यासह शहरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा
आय मिरर(देवा राखुंडे)
दीर्घकाळापासून सुरु असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करत अद्यादेश काढला आहे.यानंतर सर्वत्र फटाके फोडून पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कांदलगांव मध्ये पहाटे पाच वाजल्यापासून गावातील मुख्य चौकात तरुणांनी एकत्र येत फटाके फोडत जल्लोष केला. याच गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या लढ्याला बळ देण्यासाठी १०० हून अधिक दिवस साखळी उपोषण केले होते. तर गावातील अनेक तरुण आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला देखील गेले होते.
इंदापूर नगरपरिषदेसमोर फटाक्यांची आतिशबाजी…
राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य होतात मराठा समाज बांधवांकडून एकच जल्लोष करण्यात आला.पुण्याच्या इंदापूर शहरात नगर परिषदेच्या प्रांगणात फटाक्यांची आतिशबाजी करत एकमेकांना पेढे भरून मराठा तरुणांनी आनंद उत्सव साजरा केला.यावेळी एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या.
आमदार भरणेंकडून आनंदोत्सव साजरा…
राज्य सरकारकडून मनोज जंगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य होतात आणि दिले अनेक वर्ष प्रलंबित असणारा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागतात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मराठा समाज बांधवांना पेढे भरवत या निर्णयाचे स्वागत केले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या बावड्यातही जल्लोष……
राज्य सरकारने मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करताच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा गावात देखील फटाक्यांची आतिशबाजी करत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा गावात मराठा समाज बांधवांनी एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला आहे.
या मागण्या केल्या मान्य…
-ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र दिलं जावं. तसंच त्यांच्या कुटुंबांना देखील द्यावं.
-सरकारने सगा सोयराविषयी अध्यादेश काढला. तो जरांगे पाटलांना दिला.
-राज्यातील मराठी बांधवांवरील गुन्हे मागे घेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती.
-वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमणार
-मराठवाड्यात कमी प्रमाणात पत्र सापडले. याविषयी आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करेल.
-विधानसभेमध्ये याविषयी कायदा येणार.
What's Your Reaction?