पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ! इंदापूर पोलीस ठाण्याचा कारभार आता "या" अधिकाऱ्याकडे

Jan 3, 2024 - 22:08
 0  1597
पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ! इंदापूर पोलीस ठाण्याचा कारभार आता "या" अधिकाऱ्याकडे

आय मिरर

जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक बुधवारी झाली. या बैठकीत पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांची भोर पोलीस ठाण्यातून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

अण्णा पवार यांची आर्थिक गुन्हे शाखेतून भोर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. तर दिलीप पवार यांची इंदापूर पोलीस ठाण्यातून राजगड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली. सूर्यकांत कोकणे यांची नियंत्रण कक्षातून इंदापूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow