कांदलगाव ग्रामपंचायतीला कचरा संकलनासाठी मिळाली घंटागाडी
आय मिरर
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कांदलगाव ग्रामपंचायतीला स्मार्टग्राम योजनेतून कचरा संकलनासाठी घंटा गाडी वाहनाची सुविधा देण्यात आलीय.सदर कचरा संकलन घंटागाडीचे पूजन उपसरपंच कोंडाबाई जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते.
ग्रामपंचायत कांदलगावच्या वतीने स्मार्ट ग्राम बक्षीस योजनेतून गावासाठी कचरा संकलन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.कांदलगाव ग्रामपंचायतीला सन १९-२० चा दहा लक्ष रूपयांचा स्मार्टग्राम पुरस्कार मिळालेला आहे.सदर बक्षीस रकमेचा विनियोग शासननिर्णयाप्रमाणे अपांरपारिक ऊर्जास्त्रोत व स्वच्छता या बाबींवरती करणे अपेक्षित असते.त्यामुळे गावातील अंगणवाड्या ,ग्रामपंचायत कार्यालयाची विद्युत व्यवस्था सौरऊर्जेवर करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेविका स्वाती चव्हाण यांनी दिली.तसेच गावामध्ये कचरा संकलनासाठी ई-व्हेईकल देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना उपसरपंच जाधव म्हणाल्या की,स्वर्गीय सरपंच रविंद्र पाटील यांची गावाला सर्व सोयी सुविधा मिळाव्यात हा दूरदृष्टीकोन ठेवुन कचरा संकलन घंटागाडी घेण्याविषयी हयात असताना मत व्यक्त केले होते. तत्कालीन सरपंचाचा मनोदय यानिमित्ताने आज पूर्ण झाला.
यावेळी सदस्या रेखा बाबर,तेजमाला बाबर,किसन सरडे, बाळु गिरी ,दशरथ बाबर,तंटामुक्ती अध्यक्ष गणेश बाबर, बाळू राखुंडे,पांडुरंग जगताप,सिद्धेश्वर कोळी,उत्तम सोनवणे,रोहित सरडे, अशोक कसबे,व ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?