coronavirus : पुण्याच्या दौंड मध्ये कोरोनानं डोकं वर काढलं ; तिघांवर उपचार सुरू

Jun 4, 2025 - 10:26
 0  595
coronavirus : पुण्याच्या दौंड मध्ये कोरोनानं डोकं वर काढलं ; तिघांवर उपचार सुरू

आय मिरर 

2019 20 च्या नंतर पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर काढला आहे. राज्यातील मेट्रो शहरांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून वाढत्या कोरोनाला वेळीच झोपवण्यासाठी प्रशासन देखील अलर्ट मोड वरती आला आहे. या संदर्भात नुकतीच मंत्रालयात बैठक देखील पार पडली आहे.

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील आता कोरोना पसरू लागला आहे.पुण्याच्या दौंड तालुक्यात तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात दोन पुरुष तर एका महिलेचा समावेश आहे. या तीन बाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण हे मूळचे दौंड तालुक्यातील आहेत तर एक महिला रुग्ण हा श्रीगोंदा तालुक्यातील असून तो दौंड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय.

तर दौंड तालुक्यातील दोन पुरुष रुग्णांपैकी एका रुग्णावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरा कोरोना बाधित रुग्ण हा घरीच होम कॉरंटाइन असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

यासोबतच दौंड शहर आणि ग्रामीण भागात इतर काही कोरोनाचे रुग्ण आहेत का ? याची माहिती देखील प्रशासन घेत आहे. तर ज्या रुग्णांना कोरोना व्हायरस संदर्भात लक्षणे दिसून येतील त्यांनी तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधून आपल्या आरोग्याची तपासणी करावी कोणताही आजार अंगावर काढू नये असं आवाहनही आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

सर्दी ताप खोकला यासारखी प्राथमिक लक्षणे जाणवल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow