Indapur आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील या शिक्षकाची चमकदार कामगिरी

Jun 6, 2025 - 18:07
Jun 6, 2025 - 18:09
 0  210
Indapur आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील या शिक्षकाची चमकदार कामगिरी

आय मिरर 

इंडो- नेपाळ युथ गेम्स 2025 अंतर्गत घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील सहशिक्षक नितीन बांगर यांना रौप्य पदक मिळाले.त्यांच्या दैदिप्यमान कामगिरी बद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या स्पर्धा नेपाळ येथील दशरथ स्टेडियम कव्हर्ड हॉल,काठमांडू नेपाळ या ठिकाणी दिनांक 29, 30, 31 मे 2025 रोजी पार पडल्या.या स्पर्धेसाठी भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांग्लादेश, म्यानमार अशा वेगवेगळ्या देशातील 580 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

भारतीय खेळाडूंनी 9 सुवर्ण, 15 रौप्य, आणि 6 कांस्य पदक मिळवून देशाच्या गौरव वाढवत मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेमध्ये वयोगट 8 वर्षापासून 87 वयाच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्व गटातील स्पर्धकांची आसने अतिशय चुरशीची आणि डोळ्याचे पारणे फेडणारी होती.

संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले, उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले,सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे मुख्य सल्लागार प्रदीप गुरव, प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य राजेंद्र सरगर,विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य  गणेश पवार यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन व भरभरून कौतुक केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow