राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदान कार्याचे हर्षवर्धन पाटलांनी केले कौतुक

Jan 28, 2024 - 15:22
Jan 28, 2024 - 15:23
 0  289
राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमदान कार्याचे हर्षवर्धन पाटलांनी केले कौतुक

आय मिरर(देवा राखुंडे)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे , राष्ट्रीय सेवा योजना व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर आयोजित 'युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास ' उपक्रमांतर्गत बिजवडी ता. इंदापूर येथे दि. 23 जानेवारी ते दिनांक 29 जानेवारी या कालावधीत विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन दिनांक 23 जानेवारी रोजी झाले होते.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दि. 27 रोजी सायंकाळी या शिबिरामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनातील श्रमसंस्कार शिबिर कसे यशस्वी ठरले आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना सांगितले .विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे आपण या शिबिरामध्ये कसे सहभागी आहोत हे त्यांनी सांगितले यावेळी विद्यार्थ्यांच्या श्रमदानाच्या कार्याची माहिती घेत त्यांचे मनापासून कौतुक केले यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्वि गणित झाला होता.     

राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी शनिवारी पोंदकुलवाडी या गावामध्ये सामूहिक गाव स्वच्छतेचा उपक्रम राबवित आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण केले होते.हर्षवर्धन पाटील यांनी शिबिराच्या ठिकाणी विद्यार्थी व गावातील मान्यवरांच्या समवेत यावेळी भोजन घेतले.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी ,शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow