भगिनींनो संधीचं सोनं करायला शिका - क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे 

Mar 8, 2025 - 16:33
Mar 8, 2025 - 16:36
 0  2486
भगिनींनो संधीचं सोनं करायला शिका - क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे 

आय मिरर

बँकेकडून घेतलेल्या कर्जातून व्यवसाय उभे करा. व्यवसाय करताना अनेक अडचणी येतील अडचणीचा सामना करायला शिका. बँक तुम्हाला विश्वासाने कर्ज देते व्यवसायामध्ये स्वतःला सिद्ध करताना अनेक संधी मिळतात त्या संधीचं सोनं करायला शिका असे आवाहन राज्याचे युवककल्याण,क्रीडा, अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केले. 

 मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती इंदापूर येथे उमेद अंतर्गत 121 महिला स्वयंसहायता समुहाना 5 कोटी 9 लाख 30 हजार रुपयांचे बँक कर्ज वाटप मंजुरी पत्र मंत्री भरणे यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात वाटप करण्यात आले यावेळी ते बोलत होते. 

यावेळी गट विकास अधिकारी सचिन खुडे, प्रताप पाटील, अतुल झगडे, विष्णू तोंडे, उमेद चे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन बाबर, महिला बालकल्याण चे प्रकल्प संचालक अमोल मेरगळ आदी उपस्थित होते.

भरणे म्हणाले की, उमेदच्या माध्यमातून महिला मोठया प्रमाणात संघटीत होत आहेत. मिळालेल्या कर्जातुन व्यवसाय उभं करा. व्यवसायामध्ये चुका होतील चुकीतून माणुस शिकतो. प्रयत्न करत राहा प्रयत्नातून माणुस शिकतो.

यावेळी गट विकास अधिकारी खुडे म्हणाले की, उमेद अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहाच्या महिलाना बँक कर्ज देते ते विश्वासावर. महिला कर्ज बुडवत नाहीत याचा विश्वास बँकाना आहे. बँकेच्या सहकार्यामुळे आर्थिक वर्ष 24-25 मध्ये 38 कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. महिला कर्ज घेऊन त्याचा विनियोग व्यवस्थित करतात म्हणुन वेळेवर परतफेड करतात आणि याच विश्वासामुळे एवढ्या मोठया रकमेचे कर्ज विनतारण बँक देते.

सदरील कार्यक्रमामध्ये कर्ज वाटप करणाऱ्या बँक अधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमेद चे आदित्य मांधळे, समाधान भोरकडे, सुनिता दातखिळे, चेतन रांजणकर, अमर कदम, सागर गावडे उपस्थित होते, सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राऊत यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow