एल.जी. बनसुडे विद्यालय पळसदेव येथे बीट स्तरीय कला क्रीडा स्पर्धा संपन्न

Dec 15, 2023 - 12:06
 0  314
एल.जी. बनसुडे विद्यालय पळसदेव येथे बीट स्तरीय कला क्रीडा स्पर्धा संपन्न

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील एलजी बनसुडे विद्यालयात गुरुवार दि.१४ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवातील भिगवण बीट पातळीवरील स्पर्धा संपन्न झाल्या. 

विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे , केंद्र प्रमुख नवनाथ ओमासे , गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे , नंदा बनसुडे , सुनील वाघ , भारत बांडे , सचिन गायकवाड , प्राचार्य वंदना बनसुडे , मुख्याध्यापक राहुल वायसे , सचिव नितीन बनसुडे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले व यशवंतराव चव्हाण यांचे प्रतिमा पुजन दीपप्रज्वलन स्पर्धा उद्घाटन करण्यात आले.       

यावेळी गीता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी मुलांचे कौतुक केले. गुणवत्तेबरोबर कला , क्रीडा क्षेत्रात देखील नावलौकिक मिळवता येतो. असे सांगितले. विस्तार अधिकारी हनुमंत शिंदे यांनी प्रास्ताविक केले.      

यावेळी 1 ली 5 वी लहान गट व 6 वी ते 8 वी मोठा गट मुले व मुली लोकनृत्य , लेझीम , खो खो , कबड्डी , भजन अशा सांघिक व 100/50 मी धावणे , लांब उडी , उंच उडी ,गोळा फेक , थाळी फेक , वक्तृत्व , प्रश्नमंजुषा या सर्व स्पर्धा झाल्या. 

विजेत्या तीन क्रमांक चषक , प्रमाणपत्र व मेडल एल.जी. बनसुडे विद्यालय वतीने देण्यात आले. तसेच राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करणाऱ्या एल.जी विद्यालय पळसदेव मधील खेळाडूंचा तसेच मार्गदर्शक शिक्षक सागर बनसुडे व रुपेश भालेराव यांचा सत्कार करण्यात आला.सर्व स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एल.जी. बनसुडे विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी परिश्रम घेतले.      

यावेळी भिगवण बीट मधील वरकुटे,न्हावी, डाळज व तक्रारवाडी केंद्रातील स्पर्धक मुले , मार्गदर्शक शिक्षक , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदन संतोष हेगडे यांनी केले आभार मदने यांनी मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow