इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी अतुल झगडेंची फेरनियुक्ती

Oct 13, 2023 - 06:50
 0  608
इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी अतुल झगडेंची फेरनियुक्ती

आय मिरर

इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी झगडेवाडी गावचे सरपंच अतुल झगडे यांची फेरनिवड करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले, यावेळी माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, नानासाहेब नरुटे, हेमंत पाटील, बापूराव शेंडे, सचिन सपकाळ व इतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार दत्तात्रय भरणे यांचे निकटवर्तीय म्हणून झगडे यांची ओळख आहे, विद्युत वितरण समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून पुन्हा एकदा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे.

यावेळी बोलताना अतुल झगडे म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पक्षाचे विचार, धोरणे, कामे सर्वसामान्य नागरिकांना पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow