पाटील तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करून टक्केवारी घेणाऱ्या टोळीत गेलात ; भाजपा तालुकाध्यक्षाचा आरोप

Jan 18, 2024 - 14:56
 0  1758
पाटील तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करून टक्केवारी घेणाऱ्या टोळीत गेलात ; भाजपा तालुकाध्यक्षाचा आरोप

आय मिरर(देवा राखुंडे)

आज इंदापूर तालुक्यामधील गंगावळण येथील काही मुठभर लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे. हा पक्ष प्रवेश निष्ठा म्हणून केला नसून तो आर्थिक लालसेपोटी केला आहे. पक्षप्रवेश केलेले हे लोक आता टक्केवारी घेणाऱ्यांच्या टोळीत सहभागी झाले आहेत असा आरोप भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तुषार खराडे यांनी केला.

ज्या लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्या लोकांना भारतीय जनता पक्षाने बिनविरोध गावांमध्ये निवडून दिले. मात्र हेच लोक गावाच्या दृष्टीने सध्या गद्दार निघाले आहेत. इंदापूर मध्ये कमिशन व टक्केवारी घेणाऱ्यांची टोळी गेल्या चार पाच वर्षांपासून फोफावली आहे. त्यामध्ये अनेक निष्क्रिय लोकांचा सहभाग आहे आणि त्याच निष्क्रिय लोकांच्या भूलथापांना बळी पडून गंगावळण मधील काही लोकांनी गावाच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

जर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याला भाजपबरोबर यावे लागते. मात्र, इंदापूर मधील काही लोक संघाच्या सानिध्यात आले त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गावामध्ये बिनविरोध सरपंच झाले हे लोक जर सतत असे पक्ष बदलत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गावातील जनमताच्या विरोधात जाऊन विरोधी भूमिका घेत असेल तर अशा लोकांना गावातील सुज्ञ नागरिक खड्यासारखे बाजूला केल्याशिवाय राहणार नाहीत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow