इंदापूरच्या शेटफळ हवेलीत धडाडणार आज आमदार दत्ता भरणेंची तोफ ; होणार २५ कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन

Jan 20, 2024 - 10:30
Jan 20, 2024 - 10:40
 0  349
इंदापूरच्या शेटफळ हवेलीत धडाडणार आज आमदार दत्ता भरणेंची तोफ ; होणार २५ कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन

आय मिरर

आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकास कामांचा धडाका लावलाय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत फूट पडली आणि अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांकडून इंदापूर तालुक्याला झुकते माप मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. कोट्यावधी रुपयांचा विकास निधी इंदापुरात आमदार भरणीच्या प्रयत्नातून येत असून शनिवारी 20 जानेवारी रोजी सायं.05 वाजता इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली गावात तब्बल 25 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पाडणार आहे.यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांची जाहीर सभादेखील शेटफळ हवेलीत पार पडणार आहे.

माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, माजि जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, अभिजित तांबिले,प्रशांत पाटील, अतुल झगडे, सचिन सपकाळ, सचिन खामगळ, दशरथ डोंगरे, संजय सोनवणे, संजय चव्हाण, सतीश पांढरे, शुभम निंबाळकर, नवनाथ रुपनवर यांसह आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

 इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या गावाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहत गावाचा कायापालट करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यशस्वी झालेली दिसून येत आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाला वेगवेगळ्या विकासाच्या कामासाठी भरघोस असा निधी मिळाला आहे.

कोणत्या विकास कामांच समावेश…

शेटफळ हवेली ते बावडा रस्ता (6 कोटी 8 लक्ष), वडापुरी ते शेटफळ हवेली ते लाखेवाडी रस्ता (17 कोटी), शेटफळ हवेली (तळेवाडी रस्ता) (20 लाख), शेटफळ हवेली गारपिर (सावंत वस्ती रस्ता) ( 20 लाख), शेटफळ हवेली रानमळा रस्ता (7 लाख), शेटफळ हवेली जगताप मळा रस्ता (7 लाख), शेटफळ हवेली सुतार वस्ती अंतर्गत रस्ता (10 लाख), तळेवाडी भोसले वस्ती अंतर्गत रस्ते व हायमास्ट दिवे (15 लाख), शेटफळ हवेली गावअंतर्गत बंदिस्त गटारी (10 लाख), शेटफळ हवेली आंबेडकर उद्यान (20 लाख), आंबेडकर नगर चव्हाण वस्ती अंतर्गत रस्ते व हायमास्ट (20 लाख), शेटफळ हवेली भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण (10 लाख), संत बाळूमामा मंदिर (निरगुडेवस्ती) सभा मंडप ( 15 लाख), अंगणवाडी इमारत शेटफळ हवेली (11 लाख ), माध्यमिक विध्यालय शे. हवेली इमारती साठी (15 लाख), शेटफळ हवेली स्मशाणभूमी सुशोभीकरण ( 20 लाख) या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पाडणार आहे.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow