महाराष्ट्राने एक सुसंस्कृत नेता गमावला ! आ.अनिल बाबर यांच्या निधनाबाबत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला शोक
आय मिरर(देवा राखुंडे)
आमदार अनिल बाबर आमचे जिवलग मित्र होते. अत्यंत सकारात्मक विचाराने राजकारण, समाजकारण करणाऱ्या राज्यातील सुसंस्कृत नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा नेता हरपला आहे, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आ.अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, खानापूर-आटपाडी भागाचे विधिमंडळात लोकप्रतिनिधित्व करणारे आ.अनिल बाबर व आंम्ही अनेक वर्षे विधिमंडळात सहकारी म्हणून काम केले. खानापूर-आटपाडी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. टेंभू योजनेचे ते जनक होते. अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता.
दोनच दिवसांपूर्वी सातारला मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मुलाच्या लग्नात आमची भेट झाली, त्यावेळी आमच्या नेहमीप्रमाणे विविध विषयावर गप्पा झाल्या. मात्र आज अचानकपणे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हांस धक्का बसला आहे. आ.अनिल बाबर यांच्या जाण्याने खानापूर-आटपाडी, सांगली जिल्ह्याचे नुकसान झाले असून महाराष्ट्राने एक सुसंस्कृत नेता गमावला आहे, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
What's Your Reaction?