विजय वडेट्टीवार ओबीसी आहेत की नाही याबद्दल मला शंका- मा.आ. परिणय फुकेंचा घणाघात
आय मिरर
राज्याचे माजी राज्यमंत्री तथा ओबीसी नेते डॉ. परिणय फुके हे कॉंग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलेच संतप्त झाले आहेत. ओबीसी समाजाचा आरक्षणाचा टक्का वाढवून मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्या वडेट्टीवार यांच्या भूमिकेवर डॉ. फुके (Parinay Phuke) यांनी संताप व्यक्त केला.
परिणय फुके यांनी आपला संताप समाज माध्यमावर व्यक्त केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या भूमिकेनंतर आता त्यांचे जात प्रमाणपत्र तपासण्याची वेळ आली असल्याचे फुके म्हणाले. दरम्यान वडेट्टीवार यांना ओबीसी समाजाची वकिली करण्याचा अधिकार कोणी दिला, असा परखड सवालही डॉ. फुकेंनी केला.
विजय वडेट्टीवार यांनी जालना मध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली असता मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यात याव आणि दुसरं म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावं या दोन्ही मागण्याला त्यांनी समर्थन दिले असून खरंच जर विजय वडेट्टीवार ओबीसी समाजाचे नेते असतील तर हे कधीच बोलले नसते अशी टीका माजी आमदार परिणय फुके यांनी केली आहे.
मला शंका आहे की विजय वडेट्टीवार ओबीसी आहेत की नाही. मला त्यांची कास्ट सर्टिफिकेट बघावी लागणार कारण ओबीसी समाजाचा नेता अशा प्रकारचे व्यक्तव कधीच करू शकत नाही.ओबीसी आणि मराठ्यांचे भांडण लावण्याचे काम विजय वडेट्टीवार करीत आहेत.असा आरोप ही त्यांनी केला.
What's Your Reaction?