कांदलगांव हिंगणगांव सरडेवाडीत कॅण्डल मार्च काढत जरांगे पाटलांना समर्थन,जागोजागी साखळी उपोषणे

Oct 29, 2023 - 12:22
Oct 29, 2023 - 12:31
 0  516
कांदलगांव हिंगणगांव सरडेवाडीत कॅण्डल मार्च काढत जरांगे पाटलांना समर्थन,जागोजागी साखळी उपोषणे

आय मिरर

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. गावागावात दुसऱ्या टप्प्यातील साखळी उपोषण करत कॅण्डल मार्च काढले जाताहेत. पुण्याच्या इंदापूर मधील कांदलगाव सरडेवाडी आणि हिंगणगाव मध्ये देखील कॅण्डल मार्च काढत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यात आले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय.

कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही ! आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं ! अशा घोषणा यावेळीवदेण्यात आल्या आहेत. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध देखील नोंदवण्यात आलाय.या कॅन्डल मार्चमध्ये पुरुषांसह महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

प्रवेश बंदीचा अजित पवारांनाही फटका - मराठा आरक्षणाचा लढा अधिक तीव्र होताना दिसत असून राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील बसल्याचे पाहायला मिळालं. शनिवारी बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या गळित हंगामाचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार होता. मात्र कोणत्याही परिस्थितीत अजित पवार यांना या ठिकाणी मोळी टाकून देणार नाही अशी आक्रमक भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आणि समाजापुढे अजित पवार यांना माघार घ्यावी लागली.

इंदापूर तालुक्यातील अनेक गावात प्रवेशबंदी - राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यात 28 ऑक्टोबर पासून इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण करण्यात येत आहे. अनेक तरुण आमरण उपोषणाला बसलेले आहेत.वरकुटे बुद्रुक गावी मुंडन करीत अर्ध नग्न आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. इंदापूर तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू असून या उपोषणाला धनगर समाजाने देखील आपला पाठिंबा दर्शवला आहे. तर पुणे सोलापूर महामार्गावर पळसदेव या ठिकाणी आणि बावडा नरसिंगपूर जिल्हा परिषद गटात इंदापूर अकलूज रोडवर बागल फाट्यावर मोठ्या स्वरूपात साखळी उपोषण करण्यात येत आहे.

कांदलगांवातील आमरण उपोषणाचा दुसरा दिवस - मराठा समाजाला 50 टक्के च्या आतून ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये 9 सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.त्यानंतर आता कांदलगांव मध्ये आमरण उपोषण सुरु केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील आणि योगेश केदार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी तरुणांनी उपोषण सुरू केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow