गोल्यानं अचानक एक्झिट घेतली पण गोल्याचा व्हाट्सऐप स्टेटस चर्चेत राहिला

May 24, 2024 - 07:36
May 24, 2024 - 08:58
 0  3345
गोल्यानं अचानक एक्झिट घेतली पण गोल्याचा व्हाट्सऐप स्टेटस चर्चेत राहिला

आय मिरर

मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी उजनी धरणाच्या भीमा पात्रात एक भयावह घटना घडली.या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला.या दुर्घटनेत सहा जणांनी भीमा पात्रात जलसमाधी घेतलीय. करमाळा तालुक्यातील कुगाव येथून इंदापूर तालुक्यातील कळाशीकडे एक बोट येत होती आणि वाऱ्याच्या प्रवाहापुढे काही चाललं नाही,ही बोट क्षणात बुडाली गेली. मात्र या घटनेनंतर बोट चालक असणारा गोल्या म्हणजेच अनुराज अवघडे याचा व्हाट्सऐप स्टेटस चर्चेत आला आहे. गोल्यानं अचानक एक्झिट घेतली मात्र त्याचा स्टेटस चर्चेत राहिला.

गोल्याने आपल्या व्हाट्सऐप ला एक स्टेटस ठेवला होता. "जगा असं की लोकांनी तुम्हाला ब्लॉक नाही सर्च केलं पाहिजे" आणि गोल्याचा हा स्टेटस अखेर खरा ठरला.

मंगळवारी 21 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर तब्बल 36 तास या सहा प्रवाशांना शोधण्यासाठी गेले यात गोल्याचाही शोध सुरू होता यात गोल्यानं ठेवलेला तो स्टेटस तंतोतंत जुळाला. दुर्घटना घडल्यानंतर सायंकाळी त्याच क्षणी शोध मोहीम सुरू झाली. सर्वांची धावाधाव उडाली.रात्री नऊ वाजेपर्यंत शोध घेतला गेला मात्र रात्रीच्या अंधारापुढे मोहीम थांबली.त्यानंतर बुधवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफ चं पथक दाखल झालं आणि एनडीआरएफ मार्फत शोध सुरू झाला. बुधवारी दिवसभर एनडीआरएफने शोध मोहीम राबवली मात्र हाती काहीच लागलं नाही. जी बोट गोल्या चालवत होता केवळ तीच बोट हाती लागली मात्र गोल्यासह इतर सर्वजण बेपत्ताच होते.ती बोट ही पाण्याबाहेर काढता आली नाही. रात्री उशिरा ही शोध मोहीम थांबवण्यात आली.

त्यानंतर गुरुवारचा दिवस उजाडला आणि पुन्हा शोध कार्य सुरू झालं. सकाळी जेमतेम सात वाजल्यापासून ही मोहीम सुरू झाली आणि तासाभराच्या अंतरातच एक एक असे पाच मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले,यात गोल्याही सापडला.मात्र सर्वकाही संपलं होतं उरल्या होत्या त्या फक्त आणि फक्त आठवणी…

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow