मोठी बातमी | बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा 

Mar 30, 2024 - 20:13
 0  783
मोठी बातमी | बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा 

आय मिरर 

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. 

महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजित पवार यांनी घोषणा केली होती. आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow