Ram Satpute On Sharad Pawar राम सातपुतेंच आव्हान शरद पवार स्विकारणार ?
आय मिरर
ईव्हीएमचं भांडं फोडायचं असेल तर माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी खा.सुप्रिया सुळे यांना बारामती येथून राजीनामा द्यायला सांगून मत पत्रिकेवर मतदान घ्यावे.उत्तम जानकर यांचा बळी देण्यापेक्षा सुप्रिया सुळे यांचा राजीनामा घेऊन मत पत्रिकेवर मतदान घेऊ असा सल्ला माजी आमदार राम सातपुते यांनी खा.शरद पवार यांना देत एक प्रकारे आव्हानचं दिले आहे. मारकडवाडी गावात देशातील कुठलाही नेता येऊ देत.या सर्व गोष्टींना उतारा म्हणून भाजपकडून येत्या २ दिवसात आमदार गोपीचंद पडळकर यांची सभा होणार आहे. यामुळे मारकडवाडी येथून आ.गोपीचंद पडळकर हे थेट आता शरद पवार यांना ललकारणार आहेत.
शरद पवार यांच्या सभेला फक्त तीनशे लोक होती.आमच्या गोपीचंद पडळकर यांच्या सभेला सांगेल सभा काय असते ती.आज जो बॅनर प्रकरणा वरून जो वाद केला ते मारकडवाडी चे ग्रामस्थ नसून ते मोहिते पाटील यांचे गुंड होते.असा आरोप ही सातपुते यांनी केला.
ईव्हीएम विरोधात ठराव करा - शरद पवार
ईव्हीम विरोधातील देशातील लढ्याच केंद्र आता मारकडवाडी बनत आहे. याच मारकडवाडीत शरद पवार येऊन गेले. आणि पवारांनी थेट मारकडवाडीचे रेकॉर्ड आपण पंतप्रधान यांच्या पर्यंत घेऊन जाऊ. तुम्ही ईव्हीएम विरोधात ठराव करा. असे सांगितले.
दरम्यान शरद पवार मारकड वाडीत येण्यापूर्वीच संपूर्ण मारकडवाडीत ईव्हीएम हटाव देश बचाओ अशा आशयाचे पोस्टर लागले होते.तर भाजपाकडून देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे पोस्टर लागलेले दिसले.
मारकडवाडी प्रकरणाचा मास्टर माईंड रणजितसिंह मोहिते पाटील
उत्तम जानकर यांनी माझ्या विरोधात जर हातवरती करून पण मतदान घ्या म्हणाले किंवा त्यांच्या कोणत्याही मतदानाच्या आव्हानाला मी तयार आहे.
उत्तम जानकर आणि मोहीते पाटील यांच्या गुंडाना आव्हान करतो की आम्ही काय मेलेल्या आईच दुध पिले नाही तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या तुम्हाला उत्तर देण्यासाठी हा राम सातपुते तयार आहे.असं म्हणत मारकडवाडी प्रकरणाचा मास्टर माईंड हे रणजितसिंह मोहिते पाटील असल्याचा आरोप सातपुतेंनी केला आहे.
शरद पवारांपाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा मारकडवाडीत जाणार..
ईव्हीएम विरोधी आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव केंद्रबिंदू बनला आहे,शरद पवार आणि जयंत पाटील यांनी आज मारकडवाडी या गावात भेट दिली आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी सुद्धा मारकडवाडीत जाणार आहेत. मारकडवाडीमध्ये राहुल गांधी लॉन्गमार्च सुद्धा काढणार असल्याची शक्यता काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रज्ञा सातव यांनी वर्तवली आहे.
What's Your Reaction?