"उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात" आ.रोहित पवारांनी कोणावर केला आरोप ; वाचा 

May 13, 2024 - 14:33
May 13, 2024 - 14:38
 0  944
"उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात" आ.रोहित पवारांनी कोणावर केला आरोप ; वाचा 

आय मिरर

अहमदनगर लोकसभा मतदार संघात उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात होत असल्याचा गंभीर आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी एका पोस्टच्या माध्यमातून एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे. इतकेच नाही तर गावागावात पाकीट वाटले जात असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात महाआघाडीचे उमेदवार नीलेश लंके असा सामना होत आहे. यात विखे पाटील यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी पाकीटाच्या फोटोसह केलेली पोस्टही पहा

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पाकीटाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तर फोटोसह त्यांनी लिहिले की, 'नगर दक्षिण मतदारसंघात आज 'राजा' असलेल्या प्रत्येकाच्या नावाने उत्तरेतून एक पाकीट आलं असून यात थोडा 'प्रसाद' आणि 'मालक'मंत्री यांचं फुलाला मतदान करण्याबाबतचं निवेदन आहे. गम्मत म्हणजे अनेक गावांमध्ये स्वाभिमानी नागरिकांनी हा प्रसाद घ्यायलाच नकार दिला तर काही गावांत 'यंत्रणे'ने दिलेल्या प्रसादापैकी अर्धा प्रसाद गावातल्या वाढप्यानेच खाऊन टाकला... आता 'प्रसादात'ही आडवा हात मारला जात असेल तर आजचा 'राजा' कसा उदार होणार?'

पैशांची धुवांधार बरसात...

आमदार रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट करत नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात... होत असल्याचा आरोप केला आहे. अहमदनगर लोकसभा मतदार संघात पैशांची एक बॅग रस्त्यावर पडलेली असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भाजप तालुकाध्यक्ष पैसे वाटप करत असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून होत आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी म्हटले की, 'उत्तरे'तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात... (पारनेर) अपेक्षा आहे की, या पुरात पोलीस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!'

बारामतीसारखी पैसे वाटपाची पुनरावृत्ती अहमदनगर लोकसभा क्षेत्रात सुद्धा भाजपने कायम ठेवली. परंतु या धनशक्तीला जनशक्ती पुरून उरणार असल्याचा दावा नगर लोकसभा मतदार संघातील उमेदवार नीलेश लंके यांनी केला आहे. भाजपचे पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे याला पैसे वाटतानाच्या या व्हिडीओची शहानिशा करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील नीलेश लंके यांनी केली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow