Big Breaking | पहाटे इंदापूरच्या लामजेवाडी नजीक चार चाकीचा भीषण अपघात ! दोन पायलट चा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर
आय मिरर
बातमी आहे पुण्याच्या इंदापूर मधून,पहाटेच्या वेळी बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ वैमानिक पायलटच्या चार चाकी वाहनाला भीषण अपघात झालाय. यात दोन शिकाऊ वैमानिक पायलट चा जागीच मृत्यू झाला आहे.तर दोघेजण गंभीर जखमी झालेत. त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळतेय.
दशु शर्मा वय वर्ष 21, आणि आदित्य कणसे वय वर्ष 29 अशी मृतांची नांवे आहेत.तर कृष्णा मंगलसिंग वय वर्ष 21 व महिला पायलट चेष्टा बिश्नोई वय वर्ष 21 वर्षे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
बारामती भिगवण मार्गावर लामजेवाडी गावानजिक आज पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या हा अपघात घडला आहे. टाटा हॅरीअर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत असून हे चौघेजण बारामतीकडून भिगवणकडे निघाले होते.
यामध्ये एक महाराष्ट्रातील पायलट असून बिहार राज्यातील एक तर राजस्थानच्या एका युवतीचा ही समावेश आहे. यातील गंभीर दोघा जणांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कार नंबर BR 03 AM 9993 यावरील चालक कृष्णा मंगल सिंग वय 21 वर्ष राहणार ग्रीन पार्क मयुरेश्वर बारामती हे बारामती कडून भिगवण कडे निघाले होते.कार वरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याचे डावे बाजूचे झाडास धडकून बारामती एमआयडीसी ला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन वर पलटी झाली.
अपघाताची घटना समजताचं भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी सहा.पो.निरीक्षक विनोद महागडे,महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्ष शिंदे,ए.एस.आय. काळे,पो.हवा.वाघ,पो. काँ.वागजकर, पो.काँ.आटोळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
What's Your Reaction?