इंदापुर शहरात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद; अकरा नंतर बाजारपेठा सुरळीत
आय मिरर(देवा राखुंडे)
मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे.यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद ला इंदापूर मध्ये 100 टक्के प्रतिसाद मिळाला.स्थानिक पातळीवर ठरल्या प्रमाणे सकाळी 11 वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहरातून दुचाकी रॅली काढीत एक मराठा ,लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.दरम्यान सकाळी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद होती. दुपारनंतर पुन्हा सर्व सेवा सुरू झाल्या.
What's Your Reaction?