भारतातील पहिल्या महिला डेक अधिकारी सिमरन थोरातांचा हर्षवर्धन पाटलांकडून सन्मान
आय मिरर(देवा राखुंडे)
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भारतातील पहिल्या महिला डेक अधिकारी सिमरन ब्रम्हदेव थोरात (रा. वडापुरी) यांचा इंदापूर येथे सन्मान करण्यात आला.
इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील सिमरन थोरात यांचे इ.12 पर्यंतचे शिक्षण इंदापूर येथे नारायणदास रामदास हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर सन 2016 मध्ये त्यांनी एमएएनटीई महाविद्यालय पुणे येथे शिक्षण घेत बीएसस्सी नॉटिकल सायन्स ची पदवी संपादन केली. त्यानंतर सन 2019 मध्ये त्यांची कॅनडा देशात सिस्पन शिप मॅनेजमेंट कंपनीत निवड झाली. त्यानंतर तिने पुढील परीक्षा देऊन जहाज परवाना प्राप्त केला. त्यामुळे त्यांची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग अधिकारी म्हणून निवड झाली. या निवडीनंतर त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आहे.
या यशाचे श्रेय आई-वडील व मर्चंट नेव्ही अधिकारी असलेले बंधू शुभम थोरात यांना असल्याचे असल्याचे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधताना सिमरन थोरात त्यांनी नमूद केले. या सत्कार प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी सिमरन थोरात यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
What's Your Reaction?