बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या गोदामचं सिसिटीव्ही तब्बल 45 मिनिटे बंद ! खाबीया यांनी केला आरोप

May 13, 2024 - 12:15
May 13, 2024 - 12:30
 0  2677
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या गोदामचं सिसिटीव्ही तब्बल 45 मिनिटे बंद ! खाबीया यांनी केला आरोप

आय मिरर

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम चे जे काही गोडाऊन आहे त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सकाळी १० वाजून २५ मिनिटांपासून बंद पडलेलं होतं. यामध्ये काहीतरी काळ बेरे होण्याची शक्यता तर नाही ना असा संशय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केला आहे.

जवळपास 45 मिनिट हे सीसीटीव्ही फुटेज बंद होतं त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत हे सुद्धा कळणं फार गरजेचे आहे. असं ही खाबीया यांनी म्हटलं आहे.खाबीया यांनी त्या विभागाच्या आर ओ यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.संबंधित यावर बोलायला तयार नाहीत. असं ही खाबीया यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. राज्यातील ११ मतदारसंघात मतदान पार पडत आहे. मतदान सुरू असतानाच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या ईव्हीएमच्या गोडाउनमधील सीसीटीव्ही बंद पडल्याचे समोर आले आहे. रविवारी सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

सर्व डाटा सुरक्षित - निवडणूक आयोगाकडून खुलासा 

गोदामाचे सीसीटीव्ही फुटेज बंद पडल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. मात्र या संदर्भात माहिती घेतली असता टेक्निशियन त्या ठिकाणी काम करत होता त्यांनी एक वायर काढली होती त्यामुळे डिस्प्ले ला कॅमेरे दिसत नव्हते मात्र कोणताही गडबड घोटाळा नाही त्या कालावधीमधील सर्व डाटा रेकॉर्ड आहे कुठेही काहीही गफलत नाही असा खुलासा बारामती लोकसभा मतदार संघाच्या त निर्णय अधिकारी कविता त्रिवेदी यांनी केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow