सुपा पोलिसांना ते संशयस्पद वाटले मग सुरु झाला पाठलाग ! अन् ते निघाले एवढे मोठे गुन्हेगार
आय मिरर
बारामती तालुक्यातील सुपा पोलिसांनी रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात.या आरोपींकडून पोलिसांनी १०७ वर्षाच्या चोरी गेलेल्या मुर्तीसोबत इतर मंदिरातील देवीचे मुखुट आणि मंदिरातील वस्तु हस्तगत केल्या आहेत.
सुपे पोलिसांनी आरोपींचा पाटलाग करुन सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून त्यांना ताब्यात घेतले आहे.ओंकार शशिकांत सांळुखे रा. आनंदपुर ता. वाई जि. सातारा सध्या रा. शिरवळ पंढरपुर फाटा ता.खंडाळा जि.सातारा, तुषार अनिल पवार रा. दत्तनगर सांगवी रोड ता. खंडाळा जि.सातारा आणि सौरभ दत्तात्रय पाटणे रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा अशी त्यांची नांवे असून त्यांसोबत एक विधीसघर्ष बालकही होता.
पोलिसांनी आरोपींकडून १५ लहान मोठ्या घंटा,१ पानेश्वर देवाची मुर्ती, २ मुकुट, २ समई,१ पंचार्थी,असा माल हस्तगत केला असून या आरोपींवर पुणे जिल्ह्यातील हडपसर सुपा,भोर, वेल्हा तर सातारा जिल्ह्यातील वाटार पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासह सातारा जिल्ह्यातील भागात मंदिरात चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. यामुळे लोंकाच्या भावनेचा व श्रध्देचा विषय असल्याने सदरचे आरोपी हे अटक करणे हे पोलिसांपुढे एक मोठे आव्हान होते.
सुपा पोलीस दिनांक १६ सप्टेंबर रोजी रात्रगस्त करीत होते.यावेळी पोलीस काँस्टेबल सचिन दरेकर व सागर आशोक वाघमोडे यांना मौजे दंडवाडी गावचे हद्दीत एक मारूती सुझुकी कंपनीची अल्टो ८०० कार नं एम.एच.१२ सी.डी. ६७५७ ही रोडचे कडेला नंबरप्लेट वर चिखल लावून संशईत रित्या थांबलेली दिसली.
पोलिसांना संशय आल्याने ते गाडीजवळ जाताच गडीतील चालकाने गाडी वेगात सुपे बाजुकडे घेवुन गेला त्याच वेळी शेजारीच असलेल्या विठठ्ल मंदिरातील दोन अनोळखी इसम हे त्या ठिकाणहुन अंधारात पळुन गेले.या घटनेची माहिती संबंधित पोलीस कर्मचा-यांनी रात्रगस्त साठी असलेले सहा. पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे यांना दिली. पोलिसांनी कार घेवुन पळालेल्या इसमाचा पाटलाग करुन त्यास सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून ताब्यात घेतले.
सदर आरोपींनी वाई,राजगड,लोणंद, सातारा,जेजुरी व इतर ठिकाणी सदर प्रकारचे गुन्हे केल्या बाबत सांगत असल्याने तेथील गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, उप.विभागिय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि.मनोजकुमार नवसरे, स.पो.नि. कुलदिप संकपाळ, पो.स.ई.जिनेश कोळी, सहा. फौजदार कारंडे, पो.हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, अनिल दनाणे,अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, विनोद पवार, पो.कॉ.सचिन दरेकर,सागर वाघमोडे,संतोष जाविर,तुषार जैनक,महादेव साळुंके, किसन ताडगे,रुषीकेश विर, होम.शिवतारे यांनी केली आहे.
What's Your Reaction?