भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी ! अट्टल दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या, तीन दुचाकींसह १ लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगस्त

Jan 10, 2024 - 13:39
Jan 10, 2024 - 14:19
 0  2344
भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी ! अट्टल दुचाकी चोराच्या आवळल्या मुसक्या, तीन दुचाकींसह १ लाख चाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगस्त

आय मिरर (देवा राखुंडे/विजयकुमार गायकवाड)

इंदापूर,अकलूज बारामती परिसरातून दुचाकिंची चोरी करणाऱ्या मोटरसायकल चोरट्याच्या मुस्क्या आवळण्यात भिगवन पोलिसांना यश आला आहे त्याच्याकडून तीन मोटरसायकल आणि एक मोबाईल असा एक लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सध्या सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,दि.०१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ते दिनांक ०२ मार्च २०२३ रोजी सकाळी ०८ वाजताचे दरम्यान मौजे भादलवाडी गावचे हद्दीतुन बिल्ट कंपनीचे सिक्युरीटी केबीनचे पार्कींगमधुन प्रविण शिवाजी माने रा. लासुर्णे, ता.इंदापुर यांच्या मालकिची लाल रंगाची यमाहा आर. एक्स १०० गाडी नंबर.एम.एच.०३/पी.५६२१ ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली होती.यावरुन भिगवण पोलीस स्टेशन मध्ये ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

भिगवण परीसरामधुन खुप मोठया प्रमाणामध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्याचे गांभीर्य ओळखुन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस. निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध (डी.बी) पथकाने तपास सुरु केला.

गुन्हे शोध (डी.बी) पथकाला गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती आणि तांत्रिक विश्लेषणाचे आधारे संशयित आरोपी लखन शहाजी शिंदे, वय.२७ वर्ष, रा. भादलवाडी, ता. इंदापुर, जि.पुणे यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे गुन्ह्याचा सखोल तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.

त्यांनी बारामती तालुका व अकलुज येथुन मोटार सायकली चोरी केलेल्या व विकत घेतल्याचे कबुल केल्याच पोलीसांनी सांगितले आहे.त्याने भिगवण आणि बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त केला असून त्याच्या आणखी दोन साथीदार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक बारामती आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, भिगवण पो. स्टेचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमलदार सचिन पवार, महेश उगले, रणजीत मुळीक, अंकुश माने, यांनी केली आहे.गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले हे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow