शहा ग्लोबल स्कुल दर्जेदार शिक्षणाचा पाया मजबूत करणार - भरत शहा

आय मिरर
आपल्या कुटुंबातील लहान मुलांना कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विषयांचे शास्त्रोक्त , मूलभूत ज्ञान व माहिती असणे आवश्यक आहे. मुलांना संस्काराचा भाग लहानपणीच विकसित करणे आवश्यक आहे; त्यासाठी शहा ग्लोबल स्कुलच्या माध्यमातून तालुक्यातील लहान मुलांच्या दर्जेदार शिक्षणाचा पाया मजबूत केला जाणार आहे अशी ग्वाही शहा ग्लोबल स्कुलचे सचिव भरत शहा यांनी दिली.
इंदापूर शहरातील नव्याने सुरु होत असलेल्या, शहा ग्लोबल स्कूलच्या वतीने शहरातील पालकांसाठी शाळेच्या माहिती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. यावेळी पालकांना शैक्षणिक अभ्यासक्रम, शैक्षणिक किट्स, ईआरपी सॉफ्टवेअर, डिजिटल लर्निंगचे विषय आणि बरेच काही याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी भरत शहा यांच्या मातोश्री यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून माहिती कार्यशाळेची सुरवात करण्यात आली. यावेळी भरत शहा बोलत होते.
भरत शहा म्हणाले की, आपल्या शहरातील मुलांना शिक्षणाबरोबर त्याचा सर्वांगीण विकास, लहान वयातच करून देण्यासाठी इंनडोअर, आउटडोअर क्रीडा प्रकार, स्टेज डेअरिंग, वाढविण्यासाठी व्युनिअर केजी, सिनिअर केजी प्रथम टप्प्यात सुरु करीत आहोत. नागरिकांचा जो विश्वास आहे की, या संस्थेत जे काही मिळेल ते चांगलेच मिळेल. तो विश्वास आम्ही तुटू देणार नाही. अशीही ग्वाही शहा यांनी दिली.
यावेळी केटू टेक्निकल सर्व्हिसचे मार्गदर्शक विद्याचरण पुरंदरे सर यांनी शैक्षणिक सेवा याबाबत पालकांना माहिती दिली. यावेळी प्रास्ताविक अंगद शहा यांनी केले. यावेळी शहरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहा परिवाराची शिक्षण सेवेची प्रथा चालू ठेवणार…
मुलांमध्ये असलेली अफाट क्षमता ओळखून, मुलांना शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम करून, आम्ही भविष्यातील चांगले लीडर्स, इनोवेटर्स आणि समाजात चांगले बदल घडवतील, जे प्रगती करून, संपूर्ण समाजाची उन्नती करतील असे विद्यार्थी घडविणार आहोत. मुकुंद शहा व भरत शहा यांना शैक्षणिक क्षेत्रातील कौशल्य व अनुभव आहे. त्यांना स्थानिक परिसर व समस्या माहिती आहेत. अडचणी कशा हाताळायच्या हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे आम्ही ही शाळा चालू करून, शिक्षण क्षेत्रातील शहा परिवाराची सेवेची प्रथा चालू ठेवत आहोत. असे संस्थेचे विश्वस्त अंगद शहा यांनी सांगितले.
What's Your Reaction?






