अखेर कुंभारगाव ग्रामपंचायतची 16 तारखेला होणार सरपंच निवड

Feb 12, 2024 - 11:18
Feb 12, 2024 - 11:19
 0  740
अखेर कुंभारगाव ग्रामपंचायतची 16 तारखेला होणार सरपंच निवड

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

अनेक नाट्यमय घडामोडी नंतर इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 16 तारखेला या ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायतचे सदस्य संख्या सात आहे. त्यातील ४ सदस्य एकत्र असून दोन सदस्य दुसऱ्या बाजूला आहे तर एक सदस्याच्या अपात्रताविषयी न्यायालय लढाई सुरू आहे.

१६ तारखेला कुंभरगावला कोण होणार सरपंच? तसेच काही राजकीय हस्तक्षेप होऊन ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार का ? याची उत्सुकता संपूर्ण इंदापूर तालुक्याला लागली आहे.

कुंभारगांव ग्रामपंचायतच्या सरपंच उज्वला परदेशी यांनी सरपंच म्हणून केलेल्या कामकाजावर काही सदस्यांनी आक्षेप घेतला. हे प्रकरण राज्याच्या आयुक्तांपर्यंत गेले.आयुक्तांनी परदेशी यांना सरपंच व सदस्य पदावरुन अपात्र ठरवले. त्यानंतर परदेशी यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे धाव घेतली. ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी परदेशी यांचे अपिल मान्य करत त्यांना सरपंच व सदस्य पदी कायम राखले. या निर्णयाविरोधात विरोधी गटाने थेट उच्च न्यायालयात धाव घेत घेतली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow