पळसदेव येथील एल.जी बनसुडे विद्यालयात प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न

Apr 1, 2024 - 07:54
Apr 1, 2024 - 07:56
 0  233
पळसदेव येथील एल.जी बनसुडे विद्यालयात प्रज्ञाशोध परीक्षा संपन्न

आय मिरर

पळसदेव (ता.इंदापूर)येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी बनसुडे विद्यालयामध्ये (दि 31) रोजी इंदापूर तालुका प्रज्ञाशोध परीक्षा अभियान 2024 अंतर्गत परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने इयत्ता तिसरी व इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये वरकुटे व न्हावी केंद्रातील एकूण 366 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. 

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सचिव नितीन बनसुडे, केंद्रप्रमुख नवनाथ ओमासे, केंद्र समन्वयक भारत बांडे, प्राचार्य वंदना बनसुडे ,मुख्याध्यापक राहुल वायसे , संभाजी सूर्यवंशी, राहुल कानगुडे, संतोष हेगडे तसेच विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow