इंदापूरच्या नीरा भीमावर रविवारी पार पडणार 'शहाजी केसरी कुस्ती आखाडा',पै.सिकंदर शेख आणि पै.गौरव मच्छिवाराच्या कुस्तीकडे लागले लक्ष !
आय मिरर(देवा राखुंडे)
शहाजीनगर (ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्यावरती प्रसिद्ध शहाजी आखाड्यामध्ये लोकनेते कै.शहाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शहाजी केसरी कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे रविवारी (दि.25) दुपारी 2 वा. आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
या कुस्ती आखाड्यामध्ये सध्या देशात गाजत असलेला महाराष्ट्र केसरी पै.सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी पै.गौरव मच्छिवारा यांच्या लक्षवेधी लढत होणार आहे. तसेच महाराष्ट्र चॅम्पियन पै. माऊली कोकाटे विरुद्ध महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील, पै. प्रकाश बनकर विरुद्ध पै. महेंद्र गायकवाड, पै. दादा मुलाणी विरुद्ध पै. सुहास गोडगे, पै. मनीष रायते विरुद्ध पै. विक्रम भोसले, पै. कालीचरण सोनटक्के विरुद्ध पै. समीर शेख, पै.सतपाल सोनटक्के विरुद्ध पै.प्रशांत जगताप, पै.रवी चव्हाण विरुद्ध पै.विजय शिंदे, पै.विक्रम घोरपडे विरुद्ध पै.मामा तरंगे, पै.जमीर मुलाणी विरुद्ध पै.श्रीनिवास पाथरूट, पै.नामदेव कोकाटे विरुद्ध पै. सौरभ पाटील आदी नामांकित पैलवानांच्या निकाली कुस्त्या होणार आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
कुस्ती ही महाराष्ट्राची शान असून, कुस्ती परंपरेचे जतन व्हावे व कुस्तीगिरांना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने प्रत्येक वर्षी कै.शहाजीराव (बापू) बाजीराव पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी दि.25 फेब्रुवारीला शहाजी कुस्ती केसरी आखाड्याचे आयोजन केले जाते, अशी माहिती त्यांनी दिली. शहाजी केसरी कुस्त्यांचा जंगी आखाडा पाहण्यासाठी इंदापूर तालुका व शेजारील तालुक्यातील नागरिक, कुस्तीगीर, कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी केले.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, तानाजीराव नाईक, राजकुमार जाधव, कार्यकारी संचालक हेमंत माने उपस्थित होते. दरम्यान, या कुस्ती आखाड्याच्या नियोजनासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत कुस्ती क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकारी यांची संयुक्त बैठक इंदापूर येथे दूधगंगा संघाच्या कार्यालयात मंगळवारी (दि.20) संपन्न झाली.
शहाजी कुस्ती आखाड्यात मान्यवरांचा होणार सत्कार !
या शहाजी कुस्ती आकड्यांमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, अर्जुन पुरस्कार विजेते पै. नरसिंह यादव, अर्जुन पुरस्कार विजेते पै. राहुल आवारे, अर्जुन पुरस्कार विजेते गुरुवर्य पै. काका पवार यांचा सत्कार कारण्यात येणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
What's Your Reaction?