हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी शरद पवार आज इंदापूरात

Nov 3, 2024 - 08:50
Nov 3, 2024 - 09:05
 0  1545
हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी शरद पवार आज इंदापूरात

आय मिरर

इंदापूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या विजयासाठी आता खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत.इंदापूरात हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारी वरुन नाराज झालेल्या काही नेत्यांच्या शरद पवार आज ते गुप्त बैठका घेणार आहेत.

पवार गटातील भरत शहा,आप्पासाहेब जगदाळे यांसह प्रविण माने यांची नाराजी अद्याप दूर झाली नाही. विशेष म्हणजे प्रविण माने यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केलीय. त्यामुळे पवार आज कोणाकोणला भेटणार आणि हर्षवर्धन पाटलांच्या विजयाचा मार्ग सुखर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार हे घोलपवाडी येथे घोलप यांच्या घरी तसेच वरकुटे खुर्द येथे यादव यांच्या घरी नंतर पडस्थळ येथे रेडके यांच्या घरी भेट देणार आहेत.शिवाय इंदापूर शहरात शहा यांच्या कुटुंबाची ही पवार भेट घेणार आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow