हर्षवर्धन पाटलांच्या पाठपुराव्याला यश, खंडकरी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय - राजवर्धन पाटील

Nov 29, 2023 - 17:39
Nov 29, 2023 - 17:59
 0  678
हर्षवर्धन पाटलांच्या पाठपुराव्याला यश, खंडकरी शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय - राजवर्धन पाटील

आय मिरर

खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या क्षेत्राचा दर्जा भोगावटा वर्ग 2 वरून भोगावटा वर्ग 1 करण्याबाबत आज मंत्रिमंडळासमोर धोरणात्मक निर्णय करण्यात आला. त्यामुळे आता खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होणार असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सातत्याने खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा करत होते अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याचं नीरा भीमाचे संचालक राजवर्धन पाटील यांनी म्हटले आहे.  

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सातत्याने खंडकरी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा करत होते. हर्षवर्धन पाटील यांच्या या सर्व प्रयत्नांना यश आले असून आज संपन्न झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये भोगवटा वर्ग दोन वरून भोगवटा एक करणे बाबत निर्णय घेण्यात आला असल्याचं ही राजवर्धन पाटील यांनी म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले की,या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री मा.राधाकृष्ण विखे पाटील व हर्षवर्धन पाटील यांचे समस्त खंडकरी शेतकऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow