दौंडच्या दापोडी मधील स्नेहल तांबे ने नाव कमावलं ! मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड

आय मिरर (निलेश मोरे)
दौंड तालुक्यातील दापोडी येथील स्नेहल अशोक तांबे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एम.पी.एस.सी.) वतीने सन 2023 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालय महसूल सहाय्यक पदी निवड झाली.
स्नेहलचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. तिचे पहिली ते दहावी शिक्षण नाथनगर विद्यालय बोरीपार्धी येथून केले, व अकरावी ते पंधरावी शिक्षण महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथे केले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुणे मध्ये राहून केला. कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसाधारण मध्यमवर्गीय आहे. वडील अशोक साधु तांबे यांचा व्यावसाय शेती व विटभट्टी असून ते भैरवनाथ विकास सोसायटी दापोडीचे चेअरमन आहेत, व आई गृहिणी आहे.
माझ्या आयुष्यात सर्वात मोठा वाटा माझ्या आई-वडिलांचा आहे. त्यांनी मला कठीण काळात साथ दिली, व अभ्यास करण्यास नेहमी प्रोत्साहित केले तसेच माझे चुलते श्री संपत तांबे व शाळेचे शिक्षक सुपनर सर व तसेच महाविद्यालय जीवनात असणारे शिक्षक वृंद यांचाही मोठा वाटा आहे. कारण लहानपणीच माझ्या शिक्षणाचा पाया सर्वांनी भक्कम केला मी खडतर परिस्थितीतून हे यश मिळवले आहे कारण ग्रामीण भागात असलेल्या सोई सुविधांचा अभाव तसेच अपुरे मार्गदर्शन असूनही मला हे यश मिळाले आहे.
What's Your Reaction?






