आठ दिवसात उजनीत आलं 24 टीएमसी पाणी, दौंड मधून येणारी आवक घटली

May 30, 2025 - 10:16
May 30, 2025 - 10:24
 0  1133
आठ दिवसात उजनीत आलं 24 टीएमसी पाणी, दौंड मधून येणारी आवक घटली

आय मिरर 

पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरलेलं उजनी धरण 45 वर्षाच्या इतिहासातच पहिल्यांदाच मे महिन्यात प्लस झालं असून उजनी धरणात सध्या 20 पूर्णांक 50 टक्के इतका जिवंत पाणीसाठा आहे. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 74 पूर्णांक 64 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय.

सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात घटली गेली आहे. पावसाची संतोष धार कमी झाल्याने दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये केवळ 9 हजार 814 क्युसेक इतकीच पाण्याची आवक होत आहे.

18 एप्रिल रोजी उजनी धरण गेल होतं मृत पाणी साठ्यात...

तब्बल 123 पाणी साठवणूक क्षमतेच असणार हे उजनी धरण यावर्षी 18 एप्रिल 2025 रोजी मृत पाणी साठ्यामध्ये गेलं होतं. यावर्षी धरण हे वजा 12 पूर्णांक 30 टीएमसी इतकं मृत पाणी साठ्यात गेलं होतं.

मात्र उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पूर्व मोसमी पाऊस झाला यामुळे केवळ 40 दिवसात उजनी धरून हे मृत पाणी साठ्यातून बाहेर आलं.

21 मे रोजी उजनी धरण हे वजा 12 पूर्णांक 30 टीएमसी इतकं होतं, तरतीन दिवसांमध्ये उजनीत 1 पूर्णांक 89 टीएमसी पाणी वाढलं. 27 मे 2025 रोजी सकाळी सहा वाजता उजनी धरण हे महिन्यात मधून प्लस मध्ये आलं त्यावेळी उजनी धरणात 63 टीएमसी इतका पाणीसाठा होता. आज 30 मे 2025 रोजी उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 74 पूर्णांक 64 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय सध्या दौंड बंधाऱ्यातून उजनीत येणारी आवक मोठ्या प्रमाणात घटली गेली आहे.

आठ दिवसात उजनीत 24 टीएमसी पाण्याची आवक...

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता तबले 123 टीएमसी इतकी आहे. ज्यावेळी उजनी धरून 100% क्षमतेने भरल जातो त्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी इतका पाणीसाठा मावतो. त्यापैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो तर उर्वरित 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो. यावर्षी इतिहासात प्रथमच मे महिन्यामध्ये मुसळधार असा पूर्व मौसमी पाऊस झाला. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. पुढे नाले तुडुंब भरून वाहू लागले. याचा परिणाम म्हणून वजनी धरणात आठ दिवसांमध्ये तब्बल 24 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. असं असलं तरी उजनी धरण 100% क्षमतेने भरण्यासाठी आणखीन उजनी धरणात 43 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. मी महिन्यातच उजनी धरण बऱ्यापैकी भरल्यानंतर शेतकरीची चिंता दूर झाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow