सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवल आयुष्य ; इंदापूरच्या बोराटवाडी मधील धक्कादायक घटना  

Nov 2, 2023 - 07:28
 0  1334
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवल आयुष्य ; इंदापूरच्या बोराटवाडी मधील धक्कादायक घटना  

आय मिरर(विजयकुमार गायकवाड)

इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथे सासू सासरा व दिराच्या छळास कंटाळून सौ. सीमा सदाशिव निकम यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे .याप्रकरणी सासरा- महादेव रामचंद्र निकम, सासू- संपता व दिर गोविंद यांच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात सिमा निकम हीस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच तिची छेडछाड सासरा व दिराने केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस स्टेशनला विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सासरा महादेव रामचंद्र निकम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दीर गोविंद याचा पोलीस कसोशीन तपास करीत आहेत. या गुन्ह्या संदर्भात मृत्यू पावलेल्या सीमा हिचे वडील शिवाजी मोरे, रा- डोंबाळवाडी, ता- माळशिरस यांनी बावडा पोलीस दूरक्षेत्र येथे येऊन फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीत म्हटले आहे की जावई सदाशिव निकम याचा इंदापूर परिसरात अपघात झाला होता.त्यामध्ये तो ७० टक्के अपंग झाल्याने अंथरुणावर खेळून असल्याने त्याच्या वाटणीची जमीन सीमाही कसत होते. ती जमीन तिने कसू नये व मुलांना घेऊन माहेरी जावे यासाठी तिचा शारीरिक मानसिक छळ केला. तू विष पिऊन मर किंवा मुलांना कुठेतरी घेऊन जा इथे राहू नको अशी दमदाठी सासरचे लोक वेळोवेळी करत होते. या छळास व मारहाणीला कंटाळून तसेच सासरा व दिराच्या छेडछाडीस कंटाळून सीमा येणे घरात असलेले शेतीचे तन नाशक औषध पिऊन आत्महत्या केली. तिला उपचारासाठी अकलूज च्या खाजगी दवाखान्यात दाखल केले.मात्र,पहाटे तिची प्राणज्योत मावळली त्यानंतर माहेरच्या लोकांचा प्रचंड संताप झाला होता. 

गुन्ह्याचा अधिक तपास इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow