बायकोला मारलेली थाप आली अंगलट,त्यानं दौंड मधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केली पण…
आय मिरर
बेरोजगार असतानाही एका तरुणानं लग्नाच्या वेळी होणाऱ्या बायकोला आपण पोलिस दलात भरती झाल्याची थाप मारली.परंतु वर्षभरानंतरही तो कुठल्याच पोलिस दलात हजर न झाल्याने बायकोचं समाधान करण्यासाठी या महाशयानं थेड दौंड मधील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
जय राजेंद्र यादव वय २५ वर्षे असं या तोतया पोलिसाचं नांव असून तो अमरावती जिल्ह्यातील भातुकली तालुक्यातील विर्शी गावचा रहिवासी आहे.त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय यादव याने दोन वेळा राज्य राखीव पोलिस दलाची भरती परीक्षा दिली मात्र तो अनुत्तीर्ण झाला आहे. त्याने तायक्वांदोचे प्रशिक्षण घेतले आहे.
या महाशयाने पोलिसाचा पेहराव परिधान करुन २३ नोव्हेंबर रोजी दौंड मधील नानवीज येथील राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केली. केंद्राच्या आवारातील इमारती, कार्यालये व मैदानाचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रण केले.दरम्यान केंद्रातील अधिकारांना तो संशयास्पद वाटला आणि त्याच्याकडे केंद्रातील पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता तो तोतया पोलिस असल्याचे आढळून आले.
What's Your Reaction?