जेष्ठ सभासदांच्या हस्ते मोळीपूजन करुन निरा भिमाच्या गाळप हंगामास झाली सुरवात ! यंदा कराखाना देणार पहिली उचल 2500
आय मिरर
शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालू सन 2023-24 च्या 23 व्या ऊस गळीत हंगामाचा कारखान्याच्या 46 ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते साधेपणाने परंतु उत्साही वातावरणामध्ये मंगळवारी (दि.31) शुभारंभ करण्यात आला.
चालु गळीत हंगामामध्ये गाळपास येणाऱ्या ऊसाला पहिला उचल रु. 2500 प्रमाणे देण्यात येणार आहे. त्यानंतरचे ऊस बिलाचे हप्ते इतर कारखान्यांप्रमाणे देण्यात येतील. निरा भीमा कारखाना इतर कारखान्यांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यास बांधील आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली चालु गळीत हंगामामध्ये 6 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट सर्वांच्या सहकार्याने पुर्ण केले जाईल. शेतकऱ्यांनी आपल्या सर्व ऊस निरा भिमा कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी केले.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अनिल पाटील, अँड.कृष्णाजी यादव, सुधीर पाटील, प्रतापराव पाटील, दत्तात्रय शिर्के, दादासो घोगरे, दत्तू सवासे, हरिदास घोगरे, सुरेश मेहेर, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, अमरदीप काळकुटे, दत्तात्रय पोळ, कमाल जमादार, तानाजी नाईक, मोहन गुळवे, कार्यकारी संचालक हेमंत माने, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
What's Your Reaction?