इंदापूरचे आ.दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक ; अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून आहे ओळख

Mar 28, 2024 - 18:35
Mar 28, 2024 - 18:40
 0  1419
इंदापूरचे आ.दत्तात्रय भरणे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक ; अजित पवारांचे अत्यंत विश्वासू म्हणून आहे ओळख

आय मिरर(देवा राखुंडे)

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी ३७ जणांची स्टार प्रचारक यादी राष्ट्रीय सरचिटणीस एस. आर. कोहली यांनी जाहीर केली आहे.यामध्ये माजी राज्यमंत्री इंदापूर चे आमदार दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे. 

आमदार दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.याच सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वजनदार नेते म्हणून दत्तात्रय भरणे यांची ओळख आहे. इंदापूर विधानसभेतून भरणे हे सलग दोन वेळा विजयी झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महत्त्वाच्या खात्यांची धुरा देखील सांभाळली आहे. आमदार भरणे हे राज्यभर प्रचलित असल्याने याचा फायदा उद्याच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो याच अनुषंगाने आमदार भरणे यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केल्याचा अंदाज लावला जातोय.

या स्टार प्रचारक यादीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. के. शर्मा, सय्यद जलालूद्दीन, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार आणि प्रदेश प्रवक्ते अमोल मिटकरी, आमदार सुनिल टिंगरे, आमदार इंद्रनील नाईक, आमदार सुनिल शेळके, आमदार विक्रम काळे, आमदार चेतन तुपे, आमदार नितीन पवार, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार सतीश चव्हाण, मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, माजी आमदार अमरसिंह पंडित, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी आदींचा समावेश आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow