आमदार भरणेंना इशारा देणं सुप्रिया सुळे यांना पडणार महागात ?किंमत मोजायला तयार रहा राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाचा इशारा

Mar 27, 2024 - 07:13
 0  984
आमदार भरणेंना इशारा देणं सुप्रिया सुळे यांना पडणार महागात ?किंमत मोजायला तयार रहा राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षाचा इशारा

आय मिरर (देवा राखुंडे)

मागील चार दिवसापूर्वी इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात महाविकास आघाडीचा भव्य शेतकरी मेळावा पार पडलाय सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागलेली असून संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे आहे,कारण ननंद विरुद्ध भावजय असा थेट सामना या मतदारसंघात होत आहे. सुप्रिया सुळे यांची महाविकास आघाडी करून उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीकडून उमेदवार कोण हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही. मात्र असं असलं तरीही सुनेत्रा पवारांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे. त्यामुळे बारामती कोणाची हा प्रश्न उपस्थित झालाय शरद पवार की अजित पवार कोण राखणार बारामतीचा गड याची संपूर्ण देश वासियांना उत्सुकता आहे.

अशातच रविवारी 23 मार्च रोजी इंदापूर शहरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत आमदार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर थेट आरोप केले. इंदापूर तालुक्यात होत असलेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये जवळपास 20% कमिशन खाल्लं जातं हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे तर एखाद्या नेत्याच्या पीएकडे भल्या मोठ्या हायवा गाड्या आहेत असाही आरोप रोहित पवारांनी केला. तर सुप्रिया सुळे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचं नाव न घेता विधानसभेमध्ये पाडण्याचा इशारास दिला. इथला कार्यक्रम सोडा विधानसभेत तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार आहे याची चिंता करा असा गर्भित इशाराच सुप्रिया सुळे यांनी भरणे यांना दिला.

गेल्या पंधरा वर्षांपासून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. सुळे यांना तब्बल सात वेळा संसद रत्न पुरस्कारही मिळालाय.या सर्व कारकीर्दीत इंदापूरकरांचे मोठे योगदान ही सुप्रिया सुळे यांना मिळाले.2014 पासून दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आणि तालुक्याची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. 2014 पासून आता 2024 पर्यंत आमदार दत्तात्रय भरणे यांची सुप्रिया सुळे यांना विकास कामांसाठी मोठी साथ मिळाली मामा आणि ताईच्या जोडीने अगदी तालुक्यात दणळवळणाचे जाळे विणले.

सध्या दत्तात्रय भरणे हे अजित पवार गटात आहेत.ज्या ताई सोबत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विराजमान झाल्यापासून काम करण्याची संधी मिळाली आज त्याच ताईच्या विरोधात भरणे यांना भूमिका घ्यावी लागली आहे. तर कामाचा आमदार कसा असावा तर तो भरणे मामा सारखा असावा असं सांगणाऱ्या सुप्रिया सुळे यांनाही आता गरळ ओळखण्यास सुरुवात केली आहे. 

दत्तात्रय भरणे यांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर ही भरणे यांच्यासोबत असणाऱ्या कित्येक जाणत्या मतदारांना मनात नाही म्हटलं तरी सुळेंबद्दल सहानुभूती होती असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी "इंदापूर मिररशी" बोलताना म्हटलं.परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना ज्या आमदार भरणे यांच्या कामाच्या झपाट्याचा गोडवा खासदार सुळे यांनी गेले दहा वर्ष गायला त्याच सुप्रिया सुळे आज थेट आमदार भरणेंना पाडण्याचा इशारा देत असतील तर याच ठिकाणी सुळे यांच्या बद्दल काही कार्यकर्त्यांच्या मनात असणारी सहानुभूती संपली,आता तुम्हाला किंमत मोजावी लागेल असा गर्भित इशारा कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी दिला आहे.

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन प्रमुख पक्ष आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोन गट झाले आहेत. भारतीय जनता पार्टी चा मतदार हा सुप्रिया सुळे यांचा मतदार नाही,तो विरोधक आहे.त्यामुळे 2024 च्या लोकसभेत सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्याच मतदारांची सहानुभूतीतून काही मते पडणार होती. मात्र त्यांनी जी गरळ ओकली जो इशारा दिला त्यातून असणारी सहानभूती संपल्याचं झगडे यांनी म्हटलं आहे.झगडे यांच्या विधानाचा अर्थ घेता सुप्रिया सुळे यांनी भरणी ना दिलेला इशारा हा सुनील साठी तोट्याचा तर ठरणार नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय.

बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर विधानसभा हा पवारांचा हक्काचा घरचा मतदारसंघ मानला जातो कारण 1952 पासून या मतदारसंघावर ती पवार कुटुंबाची मजबूत पकड आहे. शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांसह पवार कुटुंबातील इतर सदस्यांची थेट नाळ इंदापूरकरांशी जोडली गेल्याने इंदापूरकर नेमकं कोणाच्या पाठीशी उभा राहणार असा प्रश्न सर्वांनाच आहे.

अजित पवारांच्या साथीने आमदार भरणेंनी गाठलं विधानसभेचे तक्त...

1990 च्या दशकापासून इंदापूर तालुक्यातील भरणे कुटुंबाचे पवार कुटुंबाची संबंध आहेत.दत्तात्रय भरणे यांच्या राजकीय राजकीय कारकीर्दीची सुरुवात इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून झाली. कारखान्याच्या संचालक पदापासून राजकीय आखाड्यात उतरलेले भरणे अजित पवारांच्या सहकार्याने अगदी महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री पदापर्यंत जाऊन विराजमान झाले. भरणे यांनी सलग दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. याचीच उतराई म्हणून आमदार भरणे पूर्ण ताकदीने अजित पवारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही ताकद लावली आहे.इंदापूर तालुक्यातून सुनेत्रा पवारांना अधिकच मताधिक्य देण्यासाठी स्वतः भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे याही प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्या आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow