अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या इंदापूरात पावसाच्या सरी ; पाण्याविना करपू लागलेल्या शेतीपिकांना काही अंशी दिलासा

आय मिरर
गेल्या अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहर आणि परिसरात आज दुपारी पावसाने हजेरी लावलीय.पावसाळा सुरु झाल्यापासून इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवलेली होती.आज पावसाच्या मध्यम सरी कोसळल्याने पाण्याविना करपू लागलेल्या शेतीपिकांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.
पावसाळा सुरु होऊन तब्बल तीन महिने झाले मात्र इंदापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेती पिके धोक्यात आली आहेत. तर जनावरांच्या चा-याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे. सध्या उजनी धरणात देखील 16.23 टक्केच जिवंत पाणी साठा आहे. अशा परिस्थितीत पावसाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या.
What's Your Reaction?






